वणी विधानसभा क्षेत्रातील क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच आमदार चषक.

0
537

वणी विधानसभा क्षेत्रातील क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच आमदार चषक.

उद्या वणी प्रीमियर लीग सीजन 2 – उद्घाटन सोहळा.

राजु तुरणकर – संपादक.

वणी प्रीमियर लीग (WPL) सीजन 2 चे उद्घाटन सोहळा उद्या, 10 जानेवारी 2025 रोजी शासकीय मैदान, पाण्याची टाकी, वणी येथे आयोजित करण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्याला यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्राचे खासदार संजय देशमुख, चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर, तसेच वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार  वामनराव कासावार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

वणी प्रीमियर लीग (WPL) हा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ग्रामीण भागातील युवा खेळाडूंच्या खेळाच्या कौशल्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित केला जात आहे. या लीगच्या माध्यमातून, खेळाडूंच्या कामगिरीला राज्य पातळीवर पोहोचवण्यासाठी संधी मिळणार आहे. विविध ग्रामीण क्षेत्रातील खेळाडूंना हे एक महत्वाचे व्यासपीठ प्रदान केला जात आहे, ज्यामुळे त्यांना आपल्या कलेचा एक नवा पल्ला ओलांडण्याचा आणि पुढे जाण्याची संधी मिळेल.

सदर लीगमध्ये विविध टीम्स सहभागी होणार आहेत. या लीगमध्ये भाग घेणाऱ्या कॉटन किंग, रंगनाथ वॉरिअर , जन्नत इलेव्हन , जेएमसीसी , हॉटेल आर जे शाईन , छत्रपती वॉरियर , शिवनेरी टायगर , अर्सलांन इलेव्हन ब्लास्टर , शिवनेरी टायगर, आर एन सी सी या संघाचे नामांकन झालेले आहे.

वणी प्रीमियर लीगचे आयोजन करणाऱ्या प्रमुख आयोजक शैलेश ढोके, नदीम शेख, मंगेश करंडे, धवल पटेल, विनोद निमकर, सचिन पांडे, संतोष चिलकावार यांचा समावेश आहे.

या स्पर्धेचे आयोजन ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यातील सामर्थ्य व कौशल्य इतर राज्यांपर्यंत पोहचवण्यासाठी करण्यात आले आहे. त्याचबरोबर, ग्रामीण भागातील तरुणांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याचे आणि चांगली कामगिरी करणाऱ्यांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळविण्याचे उद्दीष्ट आहे.

वणी प्रीमियर लीग एक महत्त्वपूर्ण मंच ठरले आहे, ज्यामुळे ग्रामीण खेळाडूंना जागतिक स्तरावर आपली क्रीडा क्षमता सिद्ध करण्याचा संधी मिळेल. खेळाचे आयोजन राज्याच्या क्रीडा प्राधिकरणाने आणि स्थानिक क्रीडा संघटनांनी दिलेल्या सहकार्याने शक्य झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here