वणी विधानसभा क्षेत्रात आमदार संजय देरकर यांचा अभिनव उपक्रम – शासकीय हेल्पलाइन सेवा सुरु

0
260

वणी विधानसभा क्षेत्रात आमदार संजय देरकर यांचा अभिनव उपक्रम – शासकीय हेल्पलाइन सेवा सुरु

वणी, दि. __ : वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या शासकीय कामांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी आमदार संजय देरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत एक अभिनव आणि जनहितकारी उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत एक शासकीय हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली असून, नागरिकांचे प्रलंबित काम सुकर आणि त्रासमुक्तपणे मार्गी लावण्याचा यामागचा उद्देश आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी अनेक किलोमीटरचा प्रवास करूनही शासकीय कार्यालयांमध्ये वेळेवर सेवा न मिळणे, पुन्हा पुन्हा चकरा माराव्या लागणे आणि कागदपत्रांच्या त्रुटींमुळे काम रखडणे या प्रकारचे अनुभव सातत्याने येतात. ही स्थिती नागरिकांसाठी मानसिक व आर्थिक त्रासदायक ठरते. याच पार्श्वभूमीवर, आमदार संजय देरकर यांनी नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाइन सेवा उपलब्ध करून दिली आहे.

कोणतेही शासकीय काम 15 दिवसांपेक्षा जास्त प्रलंबित असेल, किंवा आवश्यक माहिती मिळत नसेल, तर नागरिकांनी आपली तक्रार थेट व्हॉट्सअ‍ॅपवर 8329678738 या क्रमांकावर पाठवायची आहे. प्राप्त झालेल्या तक्रारीवर जनसंपर्क कार्यालय तात्काळ कार्यवाही करून संबंधित विभागाशी संपर्क साधेल, चौकशी करेल आणि संबंधित नागरिकांना त्याच्या कामाची माहिती देईल.

ही सेवा शेतकरी, कामगार, सामान्य नागरिक तसेच नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ही सेवा राबवण्यात येणार असून, ही एक नागरिक–प्रतिनिधी यांच्यातील विश्वासाची आणि जबाबदारीची नवी सुरुवात ठरणार आहे.

या उपक्रमामागचा एकमेव हेतू – “तुमचं काम, तुमचा हक्क! आमची सेवा, आमचं कर्तव्य!” या ब्रीदवाक्याला पुढे नेत, प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे, असे आमदार संजय देरकर यांनी याप्रसंगी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here