समाजसेवक तथा प्रसिद्ध व्यवसायिक मंगल बाबू चिडलीया यांचे निधन.
राजु तुरणकर – संपादक.
प्रसिध्द व्यक्तिमत्त्व तथा सामाजिक कार्यकर्ते मंगलबाबू चिंडालिया यांचे सोमवार दिनांक 19 मे रोजी रात्री 8-00 वाजता वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. त्यांची अतिम यात्रा आज मंगळवार दिनांक 20 मे रोजी सायंकाळी 4 वाजता छोरीया लेआऊट गणेशपुर मधील कल्पना मार्बलमागे त्यांचे निवासस्थानाहून निघेल. अंतिम संस्कार वणीतील मोक्षधाम येथे होतील.
त्यांच्या तारुण्यापासून ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक तथा धार्मिक क्षेत्रातही त्यांचें फार मोठे योगदान आहे. ते प्रखर विदर्भ राज्याचे समर्थक असल्याने अनेक आंदोलनात सहभागी झाले होते. आणि काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा योगेश, सून, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. मनमिळावू स्वभावामुळे त्यांची जनमानसात बरीच मोठी ओळख असल्याने, त्यांच्या जाण्यानं सर्वत्र शोककळा पसरली आहे.