Home Breaking News वणी करांच्या स्मृतीतील 13 वर्षापासून सुरू असलेला अखंड स्वच्छतेचा जागर.

वणी करांच्या स्मृतीतील 13 वर्षापासून सुरू असलेला अखंड स्वच्छतेचा जागर.

0
313

नगर सेवा समितीचा अखंड स्वच्छतेचा जागर..

तेरा वर्षापासून सुरू असलेला वणीकर नागरिकांच्या स्मृतीतील स्वच्छतेचा जागर…

राजू तुरणकर – वणी सलग तेरा वर्षापासून नगरसेवक समितीच्या माध्यमातून दर रविवारी साईबाबा मंदिर परिसर बाळासाहेब ठाकरे स्मारक व जैताई माता मंदिर परिसर दर रविवारी मागील तेरा वर्षापासून सातत्याने नगरसेवक स्वच्छता समितीचे अध्यक्ष माजी सैनिक नामदेवराव शेलवडे यांचे मार्फत हा अखंड स्वच्छतेचा जागर दिनकर राव ढवस यांच्या सहकार्याने सातत्याने सुरू आहे.

नामदेव राव शेलवडे दिनकर राव ढवस यांच्या माध्यमातून अखंड स्वच्छतेचा जागर.

आज नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने जैताई माता मंदिरातील संपूर्ण स्वच्छता पहाटे करण्यात आले. यावेळी नगरसेवक समितीचे अध्यक्ष, 1971  च्या पाकिस्तान विरोधी युद्धात हवाई जहाजातून पॅराशुटने उतरून पाकिस्तानात जाऊन प्रत्यक्ष युद्ध लढून देशाची सेवा करणारे व आता सतत 13 वर्षापासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक परिसर, साईबाबा मंदिर परिसर व जैताई माता मंदिर परिसर दर रविवारी पहाटे स्वच्छता करून अखंड स्वच्छतेची ज्योत पेटवून वणी नगराची सेवा करत असलेले वणी करांच्या स्मृतितील नामदेवराव शेलवडे काका , दिनकरराव ढवस माजी मुख्याध्यापक नगरपरिषद वणी, राजू तुरणकर माजी नगर सेवक हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!