राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, चिंचाळा गावात समस्यांचा महापूर.
चिकनगुनिया चे ठरले हॉटस्पॉट……
मारेगाव तालुक्यांतील चिंचाळा गावांमध्ये मागील काळात चिकनगुनिया ने उद्रेक केला होता, तरीही आरोग्य प्रशासनाला जाग आली नव्हती, आणि आता पुन्हा पावसाळा सुरू झाल्यानंतर अस्वच्छतेचा कळस मांडला आहे. सदर चिंचाळा गावांमध्ये नाल्या मधील पाण्याची आउट लेट मोकळे नसल्यामुळे जागोजागी घान पाणी साचून मलेरिया आणि डेंगू चे मच्छर पैदास तयार होत आहे. त्यामूळे पुन्हा रोगराईने डोके वर काढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यासंदर्भात वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रार करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गावामध्ये असा अस्वच्छतेने कळस मांडला असतानाही सरपंच सचिव गाढ झोपेत आहेत. नागरिक तक्रारी करून सुद्धा ग्रामसेवक लक्ष देत नाहीत, त्यामूळे अशा बेजवाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी गावातील नागरिकांमध्ये जोर धरत आहे..