Home Breaking News वरोरा, भद्रावतीत सुनील शेट्टी तर आज वणीत रविना टंडन.

वरोरा, भद्रावतीत सुनील शेट्टी तर आज वणीत रविना टंडन.

0
660

देशाच्या सुरक्षित अन् उत्तम भविष्यासाठी सुधीरभाऊंना विजयी करा : सुनील शेट्टी

सुप्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांच्या भद्रावती आणि वरोरा येथील रॊड शो ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, सुनील शेट्टीची दमदार एन्ट्री अन मुनगंटीवार चा विनिंग स्कोअर ची जोरदार चर्चा तर आज सायंकाळी वणीत रविना टंडन चा रोड शो.

राजू तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.

भद्रावती शहरात दि 13: सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा लोकनेता आपल्याला उमेदवार म्हणून लाभलेला आहे हे आपले भाग्य असून, चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या सुरक्षित आणि उत्तम भविष्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन बॉलीवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांनी केले. भद्रावती येथे आयोजित रोडशो दरम्यान ते माईक हातात घेऊन मतदारांशी संवाद तर पुष्प गुच्छ हार तुरे घेऊन लोकांना हात हातात मिळवून मुनगंटीवार यांना विजय करण्याचे आवाहन करत होते. विशेष म्हणजे यावेळी प्रचंड गर्दी झाली होती व जनतेमध्ये प्रचंड उत्सुकता होती.

चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा -शिवसेना-राष्ट्रवादी-रिपाई महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सुनील शेट्टी आज भद्रावती आणि वरोरा येथे रोड शो च्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत होते. लोकसभेची ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आणि निर्णायक असून भारताचे उज्वल भविष्य ठरविणारी आहे. यासाठी आपल्याला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनाच बघायचे असल्यामुळे भद्रावतीच्या जनतेने भविष्याचा विचार करून सुधीर मुनगंटीवार यांनाच मतदान करावे असे आवाहनही सुनील शेट्टी करीत होते.

या रोड शो मध्ये सुनील शेट्टी यांच्या समवेत विधानसभाप्रमुख रमेश राजूरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मते, चंद्रकांत गुंडावार, अफजल भाई, प्रशांत डाखरे, किशोर गोवारदीपे, सुनील नामोजवार,अंकुश आगलावे, प्रणिता शेंडे, लता भोयर, वंदना सिन्हा, युवराज धानोरकर, पप्पू सारवान, अर्चना आरेकर, इमरान खान, अमित गुंडावार, विशाल ठेंगणे, श्रीपाद भाकरे यांच्यासह भाजपा व महायुतीतील सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रसिद्ध फिल्म अभिनेत्री रविना टंडन आज वणीत.

सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सुप्रसिद्ध फिल्म अभिनेत्री रविना टंडन यांचा आज सायंकाळी साडेपाच वाजता रोड शो छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आयोजित करण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!