Home मारेगाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस मारेगावात साजरा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस मारेगावात साजरा.

0
230

महाराष्ट्राचे कार्यसम्राट मुख्यमंत्री  एकनाथ शिदे यांच्या वाढदिवसा निमित्त मारेगाव ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

आनंद नक्षणे – मारेगाव.

महाराष्ट्राच्या राजकारणातील आतापर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये अल्पावधीत कार्यसम्राट म्हणून लोकाभिमुख झालेले लोकप्रिय मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक दायित्व जोपासत शिवसेना मारेगाव तालुक्याच्या वतीने ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

विशाल  किन्हेकर तालुकाध्यक्ष मारेगाव यांच्या नेतृत्वात प्रमुख पाहुणे सुधाकर गोरे उपजिल्हाप्रमुख , किशोर नांदेकर तालुकाध्यक्ष वणी, विजय मेश्राम शहर प्रमुख मारेगाव. प्रवीण भाऊ बलकी, सुरेश भाऊ लांडे, राजूभाऊ खडसे, धर्मा जाधव, प्रशांतकुमार भंडारी, डॉक्टर बदकी,  महेश ढुमणे, नितीन कापसे, स्वप्निल त्रिवेदी, धनराज भट, आनंद नक्षणे, तेजस कापसे, उमेश उलमाले, युवराज ठाकरे युवा सेनाध्यक्ष वणी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!