घोन्सा ग्रामपंचायतचे सरपंच महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित.

0
344

घोन्सा ग्रामपंचायतचे सरपंच “महाराष्ट्र रत्न” पुरस्काराने सन्मानित.

सरपंच मंगेश मोहूर्ले यांच्या कार्याचा सन्मान.

राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर

तालुक्यातील घोन्सा ग्रामपंचायात सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे. संपुर्ण तालुक्यात प्रत्येक कामात अग्रेसर असलेल्या घोन्सा ग्रामपंयात सरपंच मंगेश मोहुर्ले यांनी वणी तालुक्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला आहे. नालंदा ऑर्गेनायजेशन संस्थेच्या सर्वेक्षणा दरम्यान “महाराष्ट्र रत्न” हा सन्मान सोहळा २०२५ पुणे येथे नुकताच पार पडला. यामध्ये महाराष्ट्रातील शेकडो ग्रामपंचायतींचा सहभाग होता. यामध्ये वणी तालुक्यातील घोन्सा ग्रामपंचायतीला केलेल्या कामांच्या निकषांच्या आधारावर प्रथम  क्रमांक पटकावला. घोन्सा गावाचे प्रथम नागरीक, सरपंच मंगेश मोहुर्ले हे “महाराष्ट्र रत्न” यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा प्रतिष्ठित पुरस्कार गाव पातळींवर केलेल्या कामांची पावती म्हणुन सरपंचाना बहाल करण्यात येतो. यापूर्वी सुद्धा तालुका स्थरावर प्रथम क्रमांक पटकावून मंगेश मोहूरले यानी तालुक्याचे लक्ष वेधले होते.

घोन्सा येथील सरपंच मंगेश मोहुर्ले यांनी आपल्या कार्यकाळात, ग्रीन एनर्जी (सोलर) पाणी पुरवठा ग्रामस्थांना गरम व थंड पाणी मोफत, शुद्ध पेयजल स्वस्थ आरोग्य, संपूर्ण गावात भूमिगत गटारे, स्वच्छ सुंदर निसर्ग रम्य परिसर असलेले ग्रामपंचायत भवन, शिक्षण व अभ्यासिका अशा अनेक सुविधा ग्रामस्थांनपर्यंत पोहचविण्याकरिता अनेक पत्रव्यवहार करुन गावात अनेक योजना करवून घेतल्या,  गावाच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेली अखंड धडपड यांचे हे यथोचित फळ असून त्यांनी केलेल्या विकास कामांची पावती असून हा त्यांच्या कार्याचा सन्मान आहे. त्यामुळे संपुर्ण घोन्सा गावाचे व सरपंच मंगेश मोहुर्ले यांचे त्यांना मिळालेल्या सन्मानाचे संपुर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here