निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगे महाराजांचा 69 स्मृती दिन संपन्न .
स्मृतिदिनाच्या निमित्ताने नगर सेवा समितीकडून ब्लेंकेट व रूग्णांना फळ वाटप, बाबांच्या विचारांची उजळणी करत अभिवादन.
राजु तुरानकर – संपादक.
निष्काम कर्मयोगी संत गाडगे बाबांच्या 20 डिसेंबर स्मृतिदिन. स्मृतिदिनाच्या निमीत्ताने बाबांनी जी समाजाला दशसुत्री सांगीतली आहे. त्यामधील रूग्णांना मदत, दुःखी व निरश्याना हिंमत व स्वच्छ्ता या तत्वांना अनुसरून बाबांच्या विचारांची व कार्याची उजळणी करून वणी शहरात बाबांना अभिवादन करण्यात आले.

नगर सेवा समिति मागील पंधरा वर्षापासून सातत्याने हा उपक्रम राबवित आहे. रात्रीला थंडीत कुडकुडत असलेल्या गरजवंतांना थंडीपासून बचाव करण्यासाठी मायची ऊब देण्यासाठी उच्च प्रतीच्या ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. बस स्टँड , रेल्वे स्टेशन, ग्रामीण रुग्णालय परिसरात, व रात्रीला रस्त्यांच्या कडेला झोपलेल्या गरजवंत लोकांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवां समितीचे अध्यक्ष नामदेवराव शेलवडे, दिनकरराव ढवस, राजु तूराणकर, नितिन बिहारी, स्माईल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर जाधव, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, अरविंद भाऊ कापसे, अमोल मोहितकर, नरेंद्र क्षिरसागर, भास्कर पत्रकार, बाळू तुरणकर, अनुराग तुरणकर, स्वप्निल बिहारी, ओम क्षिरसागर, विकास जयपुरकर, कार्तिक तुरणकर या सर्व सेवाभावी मंडळीने स्वतः थंडीत फिरून दुःखी व निरस्याना ही सेवा दिली व बाबांच्या खऱ्या विचारांचा वसा पुढे नेण्याच्या संकल्प केला.

ग्रामीण रुग्णालयात रूग्णांना फळ वाटप.
मागील 27 वर्षापासून बाबांच्या स्मृतिदिनी रुग्णांची सेवा करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात येत आहे. देव दगडात नसून माणसांत आहे असं सांगत उभी हयात अंधश्रद्धांवर हल्लाबोल करत बंजर समाज मनाची मशागत करणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांचा स्मृतिदिन त्या निमित्ताने त्यांच्या विचारांची खरी उजळणी करने समाजाला अभिप्रेत असते, त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या संदेशतील रूग्णांना मदत हे तंत्र हेरून वणी ग्रामीण रुग्णालयात रूग् यज्ञणांना फळ, बिस्कीट, गूळ चिक्की व हल्दीराम सेव पॉकिट वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामीण रुग्णालय अधिक्षक कमलाकर पोहे, डॉ भालचंद्र आवारी व सर्व कर्मचाऱ्यांच्या उपतीतीत गाडगे बाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.यावेळी राजु तुरणकर, शेखर चिंचोलकर, दिलीप मस्के, राजेश महाकुलकर, रवी कांबळे, प्रदिप मुके, समाजाचे अध्यक्ष राहुल चौधरी, संजय चिंचोलकर, उमाकांत भोजेकर, नितिन बिहारी,राजेश क्षिरसागर, राकेश क्षिरसागर, भास्कर पत्रकार, नरेंद्र क्षिरसागर, स्वप्निल बिहारी व असंख्य गाडगेबाबांच्या अनुयायांच्या उपस्थितीत फळ वाटप करुन खऱ्या अर्थाने बाबांना अभिवादन करण्यात आले.












