विजय चोरडिया यांचा पक्षप्रवेश व शेतकरी विरोधी भूमिका भाजपला भोवणार….
शेतकरी वर्गात असलेला असंतोष व भाजप पक्षातील अंतर्गत खदखद, विकास कामांचा दावा फेल..
राजु तुरणकर – लोकवाणी जागर 9422673123
भाजप पक्षात सातत्याने मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीला त्रस्त होवून भाजप पक्षाचे राज्य कार्यकारणी नेते यांनी अखेर भाजपला रामराम करीत शिवसेना ( शिंदे गटात) महाराष्ट्र राज्याचे उपमुखयमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
पक्ष प्रवेश्याचे फोटो सोसियल मीडियावर झळकताच वणी शहरात या राजकीय भूकंपाची रोजादर चर्चा सुरू झाली. माजी आमदार संजय रेड्डी बोदकुरवार व विजय चोरडिया यांच्यात अनेक दिवसापासून सूरू असलेल्या पक्षांतर्गत राजकीय संघर्षाचा अखेर अंत झाला.
विजय चोरडिया यांची राजकीय खेळी भाजपला नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महागात पडणार असल्याची जोरदार चर्चा यानिमित्ताने सुज्ञ वणी कर जनतेत चर्चिल्या जात आहे. विजय चोरडिया हे एक दानशूर व्यक्तिमत्व असून त्यांनी अनेक सामान्य माणसांच्या आयुष्याच्या इमारती उभ्या केल्या आहेत. सामाजिक उपक्रमातून जनतेच्या भल्यासाठी सातत्त्याने ते प्रयत्न करीत असतात. सामाजिक, सांस्कृतिक क्रीडा, आरोग्य क्षेत्रात त्यांच फार मोठे योगदान आहे. त्या माध्यमातून वणी शहरात त्यांच्यामागे तरुण पिढी व सुज्ञ नागरिकांची फळी निर्माण झाली आहे. मागील अनेक वर्षापासून त्यांनी सातत्याने केलेल्या कार्यातून भाजप पक्षाचे असंख्य कार्यकर्ते त्यांच्या कार्यप्रणालीवर खूष असल्याचे दिसुन येत होते, मात्र राजकीय हेव्यादाव्याला त्रस्त होवून शेवटी विजय चोरडिया यांनी भाजपला रामराम ठोकला…
नगर परीषद निवडणुकीचा ऐन तोंडावर शिंदे गटाची राजकीय खेळी…
विजय चोरडिया हे वणी शहरात सामाजिक उपक्रमातून तयार झालेले एक प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे. ते उभे असेल त्या ठिकाणी त्यांच्याकडे सर्व सामान्य जनता आदराने व सन्मानाने पाहतात . ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सेनेत प्रवेश केल्याने वणी नगर परिषदेची निवडणूक रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामूळे येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत भाजप पक्षाला याचे दूरगामी परिणाम नक्कीच होणार ? की नाही हे निवडणुक निकालानंतर माहित पडणार असल्याची जोरदार चर्चा यानिमित्ताने शहरात सूरू आहे.
स्थानीक भाजप नेत्यांना चडला मोदी उन्माद…..
संपुर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट निर्माण झाली त्यांच्या कार्यप्रणाली जनतेने त्यांच्या कार्यावर खूष होऊन अनेकांना भरभरून दिलें, त्यानिमित्ताने अनेक स्थानीक मंडळीचे राजकीय जिवन फुलले व आता मात्र त्यांना आपण जे करतोय तेच श्रेष्ठ असा आविर्भाव निर्माण झाल्याने त्यांच्या ह्या राजकीय चुका पक्षाला घरघर निर्माण करीत आहेत. आता मोदींच्या नावावर स्थानीक नेत्यांच्या दादागिरी जनता खपवून घेणार नाहीत. सतरा हजार कोटी रुपयांची कामे केल्याच्या दावा करणे ठीक आहे, पण कामे कशी झाली, कुठे झाली, रस्त्यांची दुरवस्था आहे, लोकांना चालण्याजोगे रस्ते नाही,17 कोटी खर्च करून वणी कर जनतेला पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही, जागीजागी लावलेले आरो वॉटर, हायमॅक्स लाईट बंद आहे. एवढ्या मोठ्या रकमेत वणी विधानसभा क्षेत्र झगमग व्हाव्यला पाहिजे होते… पण झगमग दूर, साधी चांगली व्यवस्था निर्माण होवू शकली नाही. विकास कामांचा दावा फेल ठरताना दिसत आहे.त्यामुळे जनतेच्या आता लक्षात आले आहे, विकास कुणाचा झाला. आता भुलथ्यापाला जनता बळी पडणार नाही हे भाजप कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने भाजप कार्यकर्त्यांच्या मनात निरुत्साह निर्माण झाला आहे.
शिवसैनकांना दडपण्याचा प्रयत्न, शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी.
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवून ओला दुष्काळ घोषित करा ही मागणी घेऊन शिवसैनिकांनी आंदोलन केले, त्यामुळे त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते .त्यामुळे शेतकरी वर्गात भाजप सरकारच्या विरोधात प्रचंड मोठा असंतोष निर्माण झाला आहे. हजारो कार्यकर्ते रस्त्यांवर उतरले या घटनेचा निषेध केला. ग्रामीण भागात भाजप कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना उत्तर देताना नाकिनव येत आहे, आणि अश्यातच विजय चोरडिया हे पक्षातून बाहेर पडल्याने येणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकात नीच्छितीच या दुफळीचा व शेतकरी विरोधी भूमिकेचा परिणाम नक्कीच होणार हे तेव्हढेच खरे.












