Home Breaking News नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने समविचारी आदिवासी बांधवांची सभा संपन्न.

नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने समविचारी आदिवासी बांधवांची सभा संपन्न.

0
409

वणी नगर परिषद निवडणुकी विषयी आदिवासी बांधवांची समवीचारी सभा संपन्न .

नगराध्यक्षा पद अनुसूचित जमातीच्या महिला साठी राखीव असल्याने, आदिवासी समाज बांधवाचा एकीचा प्रयत्न…

राजु तुरणकर वणी – 9422673123

शासकीय विश्राम गृह वणी येथे शहरातील आदिवासी समाज बांधवांची वणी नगरपरिषद निवडणूकीच्या अनुषंगाने विचार विनिमय सभा पार पडली. अनेक युवकांनी मनोगतातून एक मताने एक सुराणे आपले सकारात्मक मत मांडले. आजतागायत आदिवासी नेहमी राजकीय पक्ष्यांचा बांधेल राहिला आहे. परंतु आज वणी येथील आदिवासींना स्वतंत्र पने स्व कर्तृत्वावर स्वतःचे राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याची योग्य संधी समाज बांधवांना चालून आली आहे. 

त्याचा फायदा प्रस्थापित राजकीय पक्षाला करून देण्या पेक्षा स्वबळावर स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करून
वणीकर जनतेच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणे आणि वणी शहराचा विकास करणे हा एकच उद्देश पूर्ण करण्यासाठी
आदिवासी युवकांनी एकत्रित येऊन वज्रमूठ बांधावी असा सुर बैठकीत उमटला असून ह्या बैठकीत उपस्थित बहुतांश युवकांच्या मताला दुजोरा देत, वणी शहरातील तालुक्यातील बहुजन चळवळीत सक्रिय सहभागी असणारे आदिवासीं समाज बांधवांनी नेते मंडळींनी सुद्धा युवा वर्गांच्या मताला सहमती दर्शविली आहे.

एकंदरीत उपस्थित सर्वांच्या मते निवडणुकी संदर्भात सकारात्मक परिणाम दिसूनआल्याचे सभा आयोजकांनी सांगीतले तसेच पुढील सभेचे आयोजन करण्याच्या अनुषंगाने सर्व समाज बांधवांना नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!