मारेगाव नगरंचायतीचा लिपिक निलंबित.

0
369

कर्तव्यात कसूर ठेवल्याच्या ठपका ठेवत, नगरपंचायत लिपिक निलंबित.

मुख्याधिकारी यांच्या कारवाईने उडाली खळबळ.

आनंद नक्षणे —मारेगाव.

मारेगावं येथील नगरपंचायत प्रशासनातील लिपिक पदावर कार्यरत असलेले शेख हबीब शेख यांचेवर सातत्याने कर्तव्यात कसूर करीत असल्याचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईने कर्मचारी वर्गात खळबळ उडाली असून निष्क्रिय कर्मचाऱ्यात धास्ती निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायतच्या धर्तीवर ग्रामीण स्थानिक संस्था म्हणून मारेगाव येथे ग्रामपंचायत ला नगरपंचायत चा दर्जा देण्यात आला .

नगरपंचायत स्थापने पासून येथील काही कर्मचारी पुरते सैरभैर झाले होते. त्यातच संबंधित लिपिक हा नियमितपणे कर्तव्यात कसूर करीत कामकाजाकडे कायम दुर्लक्ष करीत असल्याचा ठपका ठेवून प्रभारी मुख्याधिकारी अरुण भगत यांनी सदर लिपिकास निलंबित केले. अनेकदा समज वा कागदोपत्री सूचना देवून सुद्धा, वर्तूनकित सुधारणा न झाल्याने हि कारवाई करण्यात आली.

या कारवाईने निष्क्रिय कर्मचाऱ्यात पुरती दहशत पसरली असून गावातील लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here