शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या उमेदवारी अर्जाच्या वाटपाला सुरुवात.

0
726

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हापरिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज सादर करण्याचे आवाहन.

शिवसैनिकात प्रचंड उत्साह, शेतकरी, शेतमजूर विरोधी सत्ताधाऱ्यांना धडा शिकविण्याची हिच वेळ – संतोष कुचनकर तालुका प्रमुख.

राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आमदार संजय भाऊ देरकर व जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या मार्गदर्शनात तालुका प्रमुख संतोष कुचनकर यांनी वणी तालुक्यांतील शिवसैनिकांना सज्जतेचा इशारा देत निवडणुकीची तयारीला लागत कामाला लागण्याचे आवाहन केले आहे. ग्रामीण भागातील जनतेमध्ये,कार्यकर्त्यांमध्ये, शिवसैनिकांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.आमदार संजय देरकर यांच्या कार्यप्रणालीवर जनता प्रचंड खुष आहे. पक्षाच्या वणी तालुका कार्यकारिणीकडून येणाऱ्या जिल्हापरिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत इच्छुक उमेदवारांसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या प्रक्रियेत निवडणुक लढवू इच्छुक असणाऱ्या शिवसैनिकांनी आपले नाव नोंदवने अनिवार्य करण्यात आले आहे, तरी या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन वणी तालुका प्रमुख संतोष कुचनकर यांनी केले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वणी तालुका कार्यकारिणीकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, ज्यांना पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवायची इच्छा आहे अशा सर्व कार्यकर्त्यांनी वणी शहरातील वरोरा रोडवरील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्ज घेणे आणि सादर करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया 3 नोव्हेंबर पासून 10 नोव्हेंबर पर्यंत चालणार असून  सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

या अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःबद्दल सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे. त्यात राजकीय अनुभव, सामाजिक कार्य, आतापर्यंत राबविलेली आंदोलने, सार्वजनिक जीवनातील योगदान, तसेच स्थानिक नागरिकांशी असलेला संपर्क यांचा तपशील द्यावा लागणार आहे. आधुनिक काळातील डिजिटल माध्यमांच्या प्रभावाचा विचार करून, अर्जामध्ये उमेदवाराच्या सोशल मीडिया उपस्थितीची माहिती (जसे की फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर), यूट्यूब इ.) मागवण्यात आली आहे.

याशिवाय, राखीव प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इच्छुकांनी त्यांच्या जात प्रमाणपत्राची आणि जात वैधता प्रमाणपत्राची प्रत जोडणे बंधनकारक आहे. अर्ज सादर करताना उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा छायाचित्रासह सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील. अपूर्ण किंवा अपुरे कागदपत्र असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. संतोष कुचनकर तालुका प्रमुख वणी 8888455773 9823983101 तालुका संपर्कप्रमुख प्रकाश भाऊ कराड,  7721087960 तालुका सचिव राजु इद्दे, तालुका संघटक संभाशिव मते 919637412327, तालुका समन्वयक रविकांत भाऊ जयस्वाल  9420023142 यांच्याशी संपर्क साधावा.

सत्ताधाऱ्यांना धडा शिकविण्याची हिच वेळ – संतोष कुचनकर.

ग्रामीण भागातील शेतकरी,शेतमजुर यांची अती पावसामुळे शेती व्यवसाय धोक्यात आल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. संपुर्ण शेतीतील पिके नष्ट झाली आहे. शेतमजुराच्या हाताला कामे नाही, सत्ताधारी सरकारच्या आर्थिक मदतीची घोषणा फसवी ठरली, शेतकऱ्यांना भुल थापा देवून फसविण्याचा सरकारचा डाव आता जनतेला कळून चुकला आहे. एन दिवाळीच्या तोंडावर राशन दुकानातून ज्वारी देवून शेतकरी शेतमजूर यांच्या तोंडाला काळे फासण्याच्या प्रयत्न सरकारकडून करण्यात आला, त्यामुळें जनसामान्य माणसात सत्ताधारी सरकारच्या विरोधात प्रचंड रोष व्यक्त होत आहे आणि हिच ती वेळ आहे अश्या अन्यायकारक आविर्भावात वागणाऱ्या सत्तापिपासू नेत्यांना खुर्चीवरून उतरवून धडा शिकविण्याची – संतोष कुचनकर तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here