महाराष्ट्र राज्याच्या सर्वोच्च सभागृहात गाजले मुद्दे, मात्र शहरात अवैध धंदे जोरात.

0
587

महाराष्ट्र राज्याच्या सर्वोच्च सभागृहात गाजले मुद्दे, मात्र शहरात अवैध धंदे जोरात…

अवैध धंदे वाल्यांची दादागिरी, पोलिसांची चिरीमिरी की गुंडाराज. नेते नेमके कश्यासाठी…

राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.

वणी शहरात कायदा सुव्यवस्था कोलमडली असून अवैध धंद्यांचा उघड सुळसुळाट सुरू आहे., वणी शहराची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. शहरात जुगार, मटका, पहाटेपासून बार उघडुन दारू विक्री, रेती व कोळसा तस्करी MD Drugs, IPL ऑनलाईन सट्टा, अवैध YEO हे सर्व धंदे अक्षरशः उघडपणे सुरू असून प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. मात्र यावर कोणत्याही राजकीय पक्षा कडून ब्र सुद्धा काढला जात नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे.

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.. ग्रामीण रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेची अवस्था देखील तितकीच भयावह आहे. सरकारी दवाखान्यांमध्ये डॉक्टर अनुपस्थित, औषधांचा तुटवडा, सुविधा अपुऱ्या – यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.

मुख्याधिकारी मुजोर. नळाद्वारे घाण पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रत्येक घरी पाणी विकत घेऊन पीत आहे. शहरात निर्जंतूकरणाची फवारणी कधीच होत नसल्याने शहरात मच्छरांचे प्रचंड प्रमाण वाढले त्यामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढला असून प्रशासन मात्र गाढ झोपेत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. वणी तलाव जवळ संध्याकाळी 7 वाजता मुख्याधिकारी व नगर परिषद कर्मचाऱ्यांना एक तास बसवून ठेवले तर मच्छरांची संख्या किती आहे हे माहित पडेल व मच्छरांची जनगणना पूर्ण होईल.

सामान्य जनता भ्रष्ट प्रशासनाने त्रस्त.शासकीय कार्यालयांमध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठला असून “पैसे दिल्याशिवाय काम होत नाही” ही परिस्थिती सर्वसामान्यांसाठी नित्याची झाली आहे. नागरिक संतप्त आहेत, पण त्यांचा आवाज दाबला जात असल्याची भावना प्रबळ होत आहे.

दरम्यान, शहरात एमडी ड्रग्स, गुटखा यांसारख्या घातक पदार्थांचा खुलेआम व्यापार सुरू असून तरुण पिढी व्यसनाच्या गर्तेत ढकलली जात आहे. इतक्या गंभीर प्रकारांवरही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नाही. “अवैध धंदेवाल्यांची दादागिरी की चिरीमिरीसाठी पोलिसांची छत्रछाया?” असा संतप्त सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.
याहून धक्कादायक बाब म्हणजे सर्व पक्षीय राजकीय नेत्यांची भूमिका पूर्णपणे निष्क्रिय असल्याचा आरोप होत आहे. जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याऐवजी काही नेते प्रशासनासोबत संगनमत करून स्वतःचे स्वार्थ साधत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
आमदार संजय देरकर यांनी वणी विधानसभा क्षेत्रांतील अवैध धंद्यांचा मुद्दा महाराष्ट्राच्या राज्याच्या सर्वोच्च सभागृहात उपस्थित केले, मात्र वणीतील गुटखा, एमडी ड्रग्स आणि मटका धंदे बिनधास्त सुरूच आहेत. त्यामुळे ही केवळ प्रशासनाची अपयशाची, हतबलतेची, कथा आहे की राजकीय नामुष्की – असा सवाल उपस्थित होत आहे.
“नेते नेमके कशासाठी?” – हा प्रश्न आता प्रत्येक वणीकराच्या मनात धगधगत आहे.
एकंदरीत, वणी शहरात जनतेचा आवाज दाबला जात असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जनतेमध्ये राजकीय पुढाऱ्यां बद्दल प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे.सर्व राजकीय पक्षांना, पक्षीय लोकप्रतिनिधींनी तात्काळ जागे होऊन ठोस कारवाई केली नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here