जनता विद्यालय वणी चा एसएससी बोर्ड परीक्षेत 86.39 टक्के निकाल.

0
595

जनता विद्यालय वणी चा एसएससी बोर्ड परीक्षेत 86.39 टक्के निकाल.

जनता विद्यालयाची यशाची परंपरा कायम. वैष्णवी पिसाराम वाढई 93%घेवून पहिली.

राजु तुरानकर वणी : जनता विद्यालय वणी विद्यालयाने यंदाच्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत 86.39 टक्के निकालाची नोंद केली आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण यश मिळवत शाळेच्या शैक्षणिक परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे.

विद्यालयातून एकूण 338 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 26 विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी मिळवली असून, 73 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 114 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 79 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

प्रविण्य प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये कु. वैष्णवी पिसाराम वाढई हिने 93.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. ऋतू गिरीश पाचभाई हिने 90.20 टक्के गुण मिळवले. तसेच कु. तन्वी चंपत पाचभाई, कु. जान्हवी उमेश मस्की आणि शुभम तुकाराम निकोडे यांनी प्रत्येकी 89.60 टक्के गुण मिळवत यश संपादन केले.

याशिवाय श्रवण विनायक बोबडे (89.40%), कु. प्रतीक्षा नितीन बुच्चे (87.60%), कु. कावेरी चंद्रभान ठावरी (85.40%), सुदेश आनंद ब्राह्मणे (85.20%), कु. ऋतुजा भाऊजी पिदुरकर (84.40%) आणि कु. श्वेता दिनेश पावडे (84.40%) यांनीही उल्लेखनीय यश मिळवले.

विद्यालयाच्या या उज्ज्वल निकालाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here