वणी शहराच्या इतिहासात पहिल्यांदा पोलीस ठाण्यात पत्रकारांच्या ठिय्या, प्रशासनाला फुटला घाम.

0
454

वणी शहराच्या इतिहासात पहिल्यांदा पोलीस ठाण्यात पत्रकारांच्या ठिय्या, प्रशासनाला फुटला घाम.

वडगाव भूखंड फसवणूक प्रकरणात चौघांविरुद्ध गुन्हा. उपविभागीय अधिकारी व  ठाणेदारांच्या भूमिकेवर संशय.

 वणी : शहरालगतच्या वडगाव येथील भूखंड फसवणूक प्रकरणात अखेर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात वणी उपविभागीय अधिकारी व वणीचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्लॉटचे कथित खोटे कागदपत्र तयार करून विक्री केल्याप्रकरणी आरोपी शैलेश दादाजी वाकडे, रा. बाबुपेठ चंद्रपूर, अर्जनवीस सतीश पुंडलीकराव केराम, रा. ओमनगर चिखलगाव, तसेच वडगावचे तत्कालीन तलाठी रविंद्र निळकंठ उपरे व मंडळ अधिकारी राजू निळंठराव डोंगरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्वांविरुद्ध खोटे दस्तऐवज तयार करणे, शासकीय नोंदीत फेरफार करणे आणि आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 318(4), 336(3), 340(2) आणि 3(5) अन्वये पोलीस स्टेशन वणी येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


दरम्यान, या प्रकरणात ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आरोपींवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही स्थानिक पोलिसांकडून तब्बल 18 महिने कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. तक्रारदार सूरज चाटे यांनी आरोप केला की, महसूल विभागाच्या चौकशी अहवालासह सर्व पुरावे पोलिसांकडे उपलब्ध असतानाही आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेषतः महसूल विभागातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल टाळण्यासाठी विविध कारणे पुढे करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
याचदरम्यान, उपविभागीय अधिकारी कार्यालय वणी येथून संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करू नये, असे पत्र पोलिसांना देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनातील कथित संगनमताबाबत संशय अधिक गडद झाला आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणातील फिर्यादी पत्रकार असून न्याय मिळवण्यासाठी पत्रकार बांधवांना पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करावे लागले. वणी शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असे आंदोलन करावे लागल्याने, शहरात मोठी चर्चा रंगली आहे. अखेर पत्रकारांच्या ठिय्या आंदोलनानंतर उशिरा रात्री FIR दाखल करण्यात आल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

वणी महसूल कार्यालयातील एक नायब तहसीलदार हे प्रकरण सेटलमेंट करण्यासाठी पैसे घेऊ प्रकरण मिटवून टाक अशी भाष्या पोलीस स्टेशनला येवून करत होते.यामुळे महसूल प्रशासनामध्ये किती गोंधळ आहे, किती साटे लोटे आहे हे या प्रकरणामुळे सिद्ध झाले आहे.
दरम्यान याप्रकरणी आजी माजी आमदारानी सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये येवून आपली रोख ठोक भूमिका घेतली, सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here