वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध पदांसाठी भरती.

0
220

वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध पदांसाठी भरती.

वणी : येथे अनुभवी, पात्र व समर्पित शिक्षकांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इंग्रजी माध्यम शाळेसाठी विविध विषयांच्या शिक्षक पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

संस्थेच्या जाहिरातीनुसार प्री-प्रायमरी शिक्षक, इंग्रजी, हिंदी, सामाजिक शास्त्र (SST), ड्रॉईंग/आर्ट अँड क्राफ्ट, कॉम्प्युटर तसेच गणित विषयांसाठी शिक्षकांची आवश्यकता आहे. संबंधित विषयातील पदवी, बी.एड., मॉन्टेसरी ट्रेनिंग, ड्रॉईंग डिप्लोमा किंवा एम.एस्सी./एमसीए अशी पात्रता आवश्यक राहणार आहे.

 इंग्रजी माध्यम शाळेसाठी अनुभवी, पात्र आणि समर्पित शिक्षकांची निवड केली जाणार असून शिक्षण क्षेत्रात ऋषितुल्य कार्य करणाऱ्या तज्ञ व भारदस्त व्यक्तिमत्त्वांना प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.

इच्छुक उमेदवारांनी आपल्या सर्व प्रमाणपत्रांसह व स्वलिखित अर्जासह बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता शाळेच्या कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुलाखतीचे ठिकाण : Wani Public School & Junior College,P-1, MIDC Area, वणी, जि. यवतमाळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here