यवतमाळ विधानपरिषद निवडणूक : दुष्यंत चतुर्वेदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

0
244

यवतमाळ विधानपरिषद निवडणूक : दुष्यंत चतुर्वेदी यांचा अर्ज दाखल.

महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय जी राठोड यांच्या उपस्थितीत अर्ज सादर.

यवतमाळ : यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी राज्याचे मंत्री व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, पराग पिंगळे, जिल्हाध्यक्ष राजूदास जाधव, सलीम खेतानी, दिपक कोकास यांच्यासह शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. महायुतीच्या वतीने ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असून आगामी काळात प्रचाराला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

यावेळी उपस्थित नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांशी संपर्क वाढवून महायुतीचा उमेदवार विजयी करण्याचे आवाहन केले. अर्ज दाखल कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here