शेतकऱ्याच्या मालावर चोरट्यांच्या नजरा….दोन लाखाच्या सोयाबीन, कापसावर चोरट्याचा डल्ला
कान्हाळगाव शिवारातील बंड्यातून सोयाबीन चोरी.
आनंद नक्षणे–मारेगाव.
तालुक्यातील कान्हाळगाव येथील नवरगाव रस्त्यालगत असलेल्या शेतातील बंड्यातून तब्बल १७ क्विंटल सोयाबीन व ७ क्विंटल कापसावर चोरट्यानी डल्ला मारून किमान दोन लाखाचे वर आयत पीक चोरून नेल्याने शेतकरी वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे.
येथील कान्हाळगाव नवरगाव रस्त्यालगत मारेगाव येथील डॉ. उत्तम माधव काळे यांचे शेत आहे. शेतातील बंड्यात सोयाबीन व कापूस साठा जमा असतांना अज्ञात चोरट्यानी शनिवारच्या मध्यरात्री हात साफ केला.
मध्यरात्री टेम्पो लावून किमान दोन लाख रुपयांचा शेतमाल फस्त केल्याचा कयास आहे. याबाबतची पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे.
गत वर्षालाही अनेक ठिकाणी अशाच स्वरूपाच्या लाखो रुपयांच्या शेतकऱ्यांच्या चोरी झाली होती मात्र आजतागायत चोरट्याचा सुगावा लागला नसल्याने, शेतकी व्यवसाय असुरक्षित झाला आहे, शेतकरी पोलीस प्रशासनावर , स्थानिक पांढरपेशिया राजकीय पुढाऱ्यावर नाराज असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन व ज्यांना शेतमाल विकला त्यांना पकडून उचित कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.