विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या.

1
342

मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील विवाहित महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या.

ऐन नवरात्री उत्सवात घटना, कूंभा गावात शोककळा.

आनंद नक्षणे_ मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील विवाहित महिलेने टाकळी शिवारात असलेल्या शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 10वाजता उघडकीस आली.या दुर्देवी घटनेने कुंभा येथे हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिभा गणपत मोहूर्ले वय वर्ष 40असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.रविवार च्या रात्री महिला घरातून निघून गेली, मात्र कोणाला कुणकुण लागला नाही.मात्र अशातच कुटुंबातील सदस्यांनी शोधाशोध घेतली मात्र रात्रभर प्रतिभाचा थांगपत्ता लागला नाही.
दरम्यान , मोहूर्ले कुटुंबाचे शेत लगतच्या टाकळी शिवारात आहे.येथील शेतातील विहीरीत प्रतिभाने रात्री उडी घेत जीवनयात्रा संपविली.आज सकाळी शोध घेतला असता तिचा मृतदेह विहिरीत तरंगत असल्याने आत्महत्येची बाब उघडकीस आली.परिणामी , सदर आत्महत्याग्रस्त महिला ही मानसिक आजाराने ग्रस्त असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.
प्रतिभाच्या पश्चात पती , 1 वर्षाचा मुलगा ,4 वर्षाची मुलगी , सासू – सासरे असा आप्तपरिवार आहे.घटनेचा तपास बिट जमादार राजू टेकाम करीत आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here