धक्कादायक…….विद्युत तार कापताना तीन मृत्यू, करोडो रुपयाच्या राष्ट्रीय संपत्तीची चोरी….उच्चस्तरीय चौकशीची मागणी.
पोलिसांचा अजब गजब कारभार मरण पावलेला मुख्य आरोपी, तर सूत्रधार मोकाट…..
राजू तूरणकर–संपादक.
शिरपूर व मुकुटबन व वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करोडो रुपयांची महावितरणच्या विद्युत तारा व लोखंडी खांब कापण्याचा सपाटा सुरू असून यात लाखों रुपये किमतीचा मुद्देमाल चोरोला गेला आहे. याबाबत विद्युत विभाग मार्फत वणी, शिरपूर आणि मुकुटबन पोलिसात तक्रार दाखल असून अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने चोरटे मोकाट फिरत आहे. गंभीर बाब म्हणजे याप्रकरणात आतापर्यंत
तिन युवकांचा विद्युत करंट लागुन मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. याबाबतची उच्चस्तरीय सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदनातून केली आहे
दिनांक १७ नोव्हेंबर २०२३ रोजी मुकुटबन पोलिस ठाण्याच्या हदीत येणाऱ्या परसोडा परिसरात विद्युत तारा कापण्याचा प्रयत्न करत असताना एका युवकाचा मृत्यू झाला आहे. अश्याच प्रकारच्या घटनेत काही महिन्यांपूवीं दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. तरीसुद्धा विद्युत तारा व लोखंडी खांब कापण्याचा सपाटा सुरूच आहे आणि चोरीतील मुद्देमाल हा भंगार व्यावसायिकांच्या घशात घातला जात आहे. भंगार व्यावसायिक मालामाल होत आहे आणि चोरटे दारुच्या नशेत आपला जीव गमावत आहे. तर विद्युत तारा कापल्यावर वारंवार विज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह शेतक-यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे १८ नोव्हेंबर २०२३ ता विद्युत तारा काण्याच्या प्रबलात एका युवकाचा मृत्यू झाल्याने या चोरी प्रकरणातील चोरटे निष्पन्न होऊनही ते मोकाट फिरत आहे. व राष्ट्रीय संपत्तीची चोरी ऐवढी मोठी गंभीर घटना उघडकीस येवूनही वणी, शिरपूर व मुकुटबन पोलिस हातावर हात जोडून कोणाला आणि कुणासाठी
कारवाई न करता हातावर हात ठेवून शांत बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या चोरीच्या घटनेचा तपास करून गुन्हेगारांवर आठ दिवसांच्या आत कारवाई न केल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या कार्यालयासमोर निदर्शने देण्यात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.