बापरे…शेतीतून 25 क्विंटल कापसाची चोरी, शेती व्यवसाय धोक्यात.

0
1776

ब्रेकिंग न्यूज,

बापरे……पुन्हा एका शेतकऱ्याचा 25 क्विंटल कापूस लंपास.., कळमना शेत शिवारातील घटना

शेती व्यवसाय आला धोक्यात, शेतकऱ्यांनी जीवन कसे जगावे :  अजिंक्य शेंडे युवासेना उपजिल्हा प्रमुख. 

राजू तूरणकर–संपादक लोकवाणी जागर.

वणी परिसरात शेतीतील शेती साहित्य शेतमाल चोरून नेण्याच्या घटनेमध्ये प्रचंड वाढ झाल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे शेतकरी वर्गात प्रचंड  दहशत निर्माण झाली आहे. शेतकरी भयभीत दिसून येत आहे. त्यांना कोणी वाली नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातलाय, रोज एक ना एक चोरीची घटना समोर येत असताना चोरटे पोलीसांच्या हाती का लागत नाही.? चोरट्यांचा बंदोबस्त कधी होणार? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

वणी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कळमना शिवारातील एका शेतातील बंड्यातून अंदाजे 25 क्विंटल कापूस चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याबाबतची तक्रार दि.5 डिसेंबर ला वणी पोलीसात दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले.

तालुक्यांतील झरपट येथे प्रविण नारायण महाकुलकार (41) हे आपल्या कुटुंबासह राहतात व शेतमजुरीचे काम करतात. त्यांनी मागील वर्षी सन 2022 मध्ये अशोक दुर्गमवार( 60) रा. राजुर कॉलरी यांचे राजुर कॉलरी शिवारात असलेले 17 एकर शेत ठेक्याने केले. त्यात त्यांनी कापसाचे पिक लावलेले असुन त्यांना यावेळी 50 क्विंटल कापुस पिकला आहे मात्र कापसाला कमी भाव असल्याने तो कापूस त्यांनी मागील एक महीन्यापूर्वी मित्र सुरेश मोखतार सिंह(65) रा. राजुर कॉलरी यांचे मालकीचे कळमणा शेत शिवारात ताराचे कंम्पाऊंन्ड असलेल्या शेतामध्ये स्लॅपच्या पक्क्या बंड्यात 50 क्विंटल कापुस सुरक्षेच्या दृष्टीने ठेवला होता. दि. 4 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजच्या सुमारास सदर बंड्यामध्ये ठेवलेला कापुस जावुन पाहीला असता तेव्हा कापुस सुरक्षित दिसुन आला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. 5 डिसेंबर ला सकाळी 9 ते 10 वाजता च्या सुमारास प्रविण च्या मित्राचा फोन की, शेतात असलेल्या ताराचे कंम्पाउंड कापुन बंड्याला असलेले समोरील लोखंडी दरवाज्याला लावलेले कुलुप तोडुन आत प्रवेश करुन अंदाजे 25 क्विंटल कापुस कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला आहे. अशी माहिती मिळताच प्रविण महाकुलकार हे दि. 5 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजच्या सुमारास ज्या बंड्यात कापूस ठेवला होता तिथे जावुन बघीतले असता 50 क्विंटल पैकी अंदाजे 25 क्विंटल कापुस किमंत अंदाजे 1 लाख 63 हजार रुपयेचा कोणीतरी अज्ञात चोराने बंड्यात प्रवेश करुन चोरुन नेल्याचे दिसून आले.

हि घटना दि. 4 डिसेंबर 2023 चे रात्री व 5 डिसेंबर चे पहाटेच्या दरम्यान घडली असावी, याबाबत कळमना शेत शिवारातील शेतातील ताराचे कंम्पाऊंन्ड कापुन स्लॅपच्या पक्क्या बंड्यात ठेवलेला 50 क्विंटल कापुस पैकी अंदाजे 25 क्विंटल कापुस किंमत अंदाजे 1 लाख 63 हजार रुपयाचा बंड्याला असलेले लोखंडी दरवाज्याला लावलेले कुलुप तोडुन आत प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोराने कापुस चोरुन नेला आहे. प्रविण नारायण महाकुलकार रा.झरपट यांच्या फिर्यादीवरून वणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवी कलम 461,380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भंगार चोरट्यांमुळे शेती व्यवसायाला धोका: अजिंक्य शेंडे युवा सेना उपजिल्हाप्रमुख.

चोरट्यांनी शेतमालावर डल्ला मारून कापूस चोरून नेला. आठ ते दहा शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारीच्या वायरिंग असा सुमारे लाखो रुपयांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांना पोलीस प्रशासनाकडे लेखी तक्रार करून चोरट्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत चोरटे सापडले नाही. मात्र चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, शेतकऱ्यांनी आता जीवन कसे जगावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी शेतकऱ्यांचे रिपोर्ट सरळ स्टेशन डायरीत नोंद घेऊन  चोरट्यांचा व हे चोरीचे साहित्य विकत घेणाऱ्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी, शेतकऱ्यांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी दोन दिवसांपूर्वीच युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here