वणीच्या जैन लेआऊट मधील युवकांचा शिवसेना ( ऊ बा ठा) गटात प्रवेश….
शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत संजय देरकर यांना निवडूण आणण्याचा निर्धार..
लोकवाणी जागर वृत्त
जैन लेआऊट परिसरात विद्यमान आमदार संजीव रेड्डी यांनी केलेली विकास कामे यामुळे जैन लेआऊट हा गड मानला जात होता.परंतु त्या वादग्रस्त वक्तव्याने भावना दुखावलेल्या स्वाभिमानी युवकांनी भाजपाला रामराम करीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत संजय देरकर यांचे निवासस्थानी शिवबंधन बांधून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी दिपक कोकास, रवि बोढेकर, राजु तुरणकर, सुधिर थेरे, प्रशांत बलकी, गोपी पुरवार, बंटी येरणे, तुलशी तेवर, शंकर देरकर उपस्थित होते.
हि तर स्वाभिमानाची लढाई, तरुण युवकांची घोषणा.
वणी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या कार्यालयात कुणबी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने जैन लेआऊट येथील भाजप पक्ष्याचे तरुण कार्यकर्त्यांची मने दुखावली गेल्याने, चेतन लोखंडे, अमोल बर्डे, शिवम रिंगोले सचिन लांडगे, ओम मुसळे, सुमित बोबडे, गौरव आसुटकर, शुभम सातपुते, श्रेयश पी, आशिष पोतराजे, विलास आसुटकर, सुनील राजूरकर वाघदरा व पुंडलिक जाधव वाघदरा, गणेष कावरे, अक्षय चौधरी यांनी प्रवेश करीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांना निवडूण आणण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे सांगितले..