रेकॉर्ड ब्रेक गर्दीत, इंदुरीकर महाराजांचा कीर्तन सोहळा संपन्न.

0
1838

इंदुरीकर महाराज वणीत, रेकॉर्ड ब्रेक गर्दी, किर्तन सोहळा संपन्न.

चालू राजकीय घडामोडींवर भाष्य.

वणीतील गर्दीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक, लोकवाणीचा अंदाज खरा….

राजू तूरणकर _संपादक.

महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कीर्तनकार, प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांचा आज 13 डिसेंबर रोजी वणी येथील शासकीय मैदानावर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

निवृत्ती काशिनाथ देशमुख (निवृत्ती महाराज व इंदुरीकर महाराज नावाने लोकप्रिय), हे महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधक आहेत. आज त्यांनी  कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून, चालू राजकीय घडामोडींवर कडाडून टीका केली.  कीर्तनातून लोकांना विनोद करीत खळखळून हसवित, जनतेसमोर प्रेरणादायी विचार सुद्धा मांडले. तर तरुणांना दारूच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी संपूर्ण तालुक्यातून जनसमुदाय लोटला होता.

गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वणी आणि रेणुका इरिगेशनच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांच्या पुढाकाराने ह.भ.प. इंदोरीकर महाराजांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा ताई धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावर, माजी आमदार विश्वास भाऊ नांदेकर, रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था अध्यक्ष देवीदास काळे, मोरेश्वर पावडे, प्रमोद वासेकर, महिला काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष वंदना ताई आवारी, अरुणाताई खंडाळकर, मुन्ना महाराज तुग्णायत, आशिष मोहितकर, मेघश्याम तांबेकर, यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. टिकाराम कोंगरे यांनी तर सूत्र संचालन सागर मुने यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here