अंधाराचा फायदा घेत उभ्या ट्रॅक्टरच्या बॅटरीवर चोरट्यांच्या नजरा.

0
190

अंधाराचा फायदा घेत उभ्या ट्रॅक्टरची बॅटरी चोरट्यांनी लांबवली.

चोरांचा धुमाकूळ कुंभा-मार्डी परिसरात बॅटरी , इलेक्ट्रिक मोटर, शेतमाल चोरटे बिनधास्त, एकामागून एक चोरीच्या घटना.

आनंद नक्षणे मारेगाव

पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कुंभा,मार्डी बिट मध्ये बॅटरी चोरटे सक्रिय झाले असून पहापळ येथील एका टॅक्टर मालकाच्या टॅक्टरच्या बॅटरीची चोरी झाल्याची घटना घडली आहे.

भय्याजी अंबादास कनाके पहापळ असे बॅटरीची चोरी झालेल्या टॅक्टर मालकाचे नाव आहे.
आज 3डिसेम्बरच्या पहाटे 2वाजता दरम्यान बाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या टॅक्टरच्या बॅटरीची चोरी झाली आहे. घटनेची तक्रार मारेगाव पोलिसात करण्यात आली आहे. सण 13/12/2021 मध्ये भय्याजी कनाके यांनी ही बॅटरी खरेदी केली होती. मात्र गॅरंटी पिरेड मध्ये असलेल्या या बॅटरीवर हात साफ करण्यात चोरट्याना यश आले आहे.यापूर्वी सुध्दा मार्डी तथा परिसरातील टॅक्टर मालकाच्या घराबाहेर उभ्या असलेल्या टॅक्टरच्या बॅटऱ्या चोरी गेल्या होत्या.मात्र अजूनही बॅटरी चोरटे मारेगाव पोलिसाच्या हाती लागलेले नाही, त्यामुळे या चोरट्याची हिम्मत आणखी वाढली असून आज पहाटे 2वाजता किनाके याची बॅटरी लंपास केली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या शेतात शेती पिकाच्या संरक्षणासाठी वापरलेल्या कंपाडच्या झटका बॅटऱ्या चोरूनं नेल्या होत्या. ते चोरटे अजूनही हाती लागलेले नाही. भय्याजी कनाके यांचे शेतातील इंजिन चोरून नेले होते. शेतीतील कापूस सोयाबीन चोरून नेल्याची सुद्धा घटना घडली यामुळे शेती व्यवसाय सुरक्षिततेच्या प्रश्नावरून धोक्यात आला शेतकऱ्यांचा कोणी वाली उरला नसल्याची शेतकरी वर्गात चर्चा या घटनेमुळे शेतकरी वर्गात पोलीस प्रशासनाबद्दल  प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.आज पुन्हा त्यांच्याच बॅटरीवर हात मारल्याने वस्तूच्या पळतीवर अज्ञात व्यक्ती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. बॅटरी चोरट्याच्या शोध मारेगाव पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here