मनसे चा पुढाकाराने २२ ला वणी भगवीमय तर मारेगावात पंच कुंडी महायज्ञ – राजु उंबरकर
राम मंदिर उद्घाटन धर्तीवर वणी शहरात महाआरती, लेजर शो आणि फटाक्याची शाही आतिषबाजी.
राजू तुरानकर –संपादक/आनंद नक्षणे–मारेगाव प्रतिनिधी.
सर्व देशवासियांना प्रतीक्षेत असलेले अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन आणि प्रभू रामचंद्र मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोमवारी (दि. २२) रोजी होणार आहे. अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण आणि मूर्तीच्या स्थापनेमुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे पाचशे वर्षानंतर श्री राम मंदिराचे स्वप्न साकार होत आहे. ठिकठिकाणी मिरवणूक, होमहवन आदी धार्मिक विधींचे आयोजन केले आहे. घरोघरी, मंदिर परिसर भगव्या पताका आणि दिव्यांनी उजळून निघणार आहे. याचे औचित्य साधून वणी येथे भव्य महाआरती, लेझर शो आणि फटाक्यांची शाही आतिषबाजी असून संपूर्ण वणी शहर भगवमय होणार आहे. अशी माहिती या कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष नेते राजु उंबरकर यांनी माहिती दिली.
मारेगावात पंच कुंडी महायज्ञ
अयोध्या राम मंदीर, मूर्ती प्राण प्रतिष्ठानाचे औचित्य येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्या नगरीत प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त मारेगाव येथे पंच कुंडी महायज्ञाचे आयोजन सोमवार दि.22 जानेवारीला ला सकाळी 9 वाजता करण्यात आले आहे. तमाम भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन मारेगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
पंचभूताचे महत्व सृष्टीच्या तत्वज्ञानाशी संबंधित असतांना विश्वातील प्रत्येक गोष्ट पाच घटकांनी बनलेली आहे. ही कल्पना संकल्पना, समतोल आणि समरसतेशी जोडलेली आहे.मंदीर आणि विधी मध्ये पंचभूताचा संबंध मानवी शरीरात देखील असतो. एकूणच पंचभूताचा उद्देश विश्वाचे स्वरूप अन मानवी शरीर समजून घेण्यासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करणे आणि व्यक्तींना स्वतः मध्ये समतोल वाढविण्यास मदत करणे हा असतांना राम मंदीर व मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठाचे औचित्य साधून पंच कुंडी महायज्ञ चे आयोजन करण्यात आले आहे.
मारेगाव नगरपंचायत कार्यालय समोर असलेल्या हनुमान मंदिरात सोमवार ला सकाळी 9 वाजता आयोजित महायज्ञास तमाम भाविकांनी सहभाग दर्शविण्याचे आवाहन मारेगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष चांद बहादे यांनी केले आहे.