निष्ठावंत शिवसैनिक राजाराम लक्ष्मण लोहकरे यांचे दुःखद निधन .
राजू तुरानकर – संपादक.
वणी शहरातील तेली फैल निवासी राजाराम उर्फ राजाभाऊ लक्ष्मण लोहकरे यांचे आज पहाटे अचानक तबीयत बिघडून खोकला आला व त्यांच्या राहते घरी निधन झाले ते 64 वर्षाचे होते.
निष्ठावंत शिवसैनिक राजाभाऊ लोहकरे या नावाने प्रसिद्ध असलेले, शांत व संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती वणी चे संचालक पद भूषविले आहे. त्यांचे मागे दोन मुले व एक मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधन वार्ता ने संपूर्ण वणी शहरात शोककळा पसरली आहे.
समाजसेवक नारायणराव गोडे यांची जिवलग मित्र म्हणून ख्याती असलेले राजाभाऊ लोहकरे यांचे निधन वार्ता ऐकून नारायण गोडे यांचे मन सुन्न झाले. त्यांनी लोकवाणी जागर जवळ आपल्या संवेदना व्यक्त करीत, आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना केली.
आज वणी येथील मोक्षधाम मध्ये 1 वाजता अंतीमसंस्कर करण्यात येणार आहे.