संजय देरकर वणी विधानसभा सभा प्रमुख पदी.

0
507

जनाधार असलेल्या नेत्याला विधानसभेची सूत्रे, संजय देरकर विधानसभा प्रमुख पदी.

वणी विधानसभेवर भगवा फडकणार ?

राजू तूरणकर – संपादक.

विधानसभा क्षेत्रातील खंबीर नेतृत्व म्हणून संजय दरेकर यांच्याकडे पाहिल्या जाते. वणी नगर परिषदेचे नगराध्यक्ष म्हणून राहिलेली यशस्वी कामगिरी, नगरपरिषद वरती सतत पाच वेळा नगराध्यक्ष बसवण्याचा मान, एका वेळा देरकर यांच्याच मदतीने वणी नगरपरिषद वरती शिवसेनेला नगराध्यक्ष पद भूषविता आले. शिवसेनेचे प्रतिनिधी आमदार म्हणून निवडून आले होते, त्यावेळेस संजय दरेकर यांची निवडणुकीतून  माघार घेण्याची भूमिका शिवसेनेसाठी संजीवनी ठरली होती. अनेक वेळा विधानसभा लढण्याचा अनुभव पाहता, लोकांशी दांडगा संपर्क ठेवून वेळोवेळी समाजातील वंचित शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संजय दरेकर यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून कामे सुरू आहे.

अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना (उ.बा. ठा) या पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला, व त्यांच्यावर दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी पक्ष नेतृत्वाने वणी विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी दिली. या जबाबदारीचा पुरेपूर उपयोग करून पक्ष तळागाळापर्यंत घेऊन जाण्याचं काम या पदाच्या माध्यमातून करणार असल्याचे संजय देरकर यांनी सांगितले.
वणी विधानसभा क्षेत्रात एकदा मतदारांनी शिवसेनेला पसंती देवून विधानसभेत प्रतिनिधी पाठवला आहे. अनेक पदाधिकारी आजही पक्षात आदेशाची वाट पाहतो आहे. शिवसैनिकात उत्साह निर्माण झाला असून आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांची सांगड घालून त्यांना एकत्र आणल्यास शिवसैनिकांचे  हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबां वरती असणार प्रेम, निष्ठा पाहता येणाऱ्या काळात नक्कीच शिवसेना (उ.बा. ठा) पक्ष वणी विधानसभेमध्ये मोठे परिवर्तन पाहायला मिळेल असेच काहीसे चित्र दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here