खळबळजनक बातमी ….पत्रकार व शिक्षकावर विनयभंगाचे गुन्हे दाखल.
षडयंत्र रचून फसविण्याचा प्रयत्न, राजकीय पुढारी, पत्रकार व पोलीस प्रशासन संशयाच्या भूमिकेत.
पत्रकार संघटना आक्रमक.
लोकवाणी जागर वृत्त.
यवतमाळ जिल्हातील मारेगांव येथे पत्रकार तथा शिक्षकावर एका बाईला समोर करून सुनियोजित खोटे गुन्हे दाखल करण्याच्या लांछनास्पद प्रकार समोर आला आहे.
मारेगाव ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार खंडेराव यांना निलंबित करा व खोट्या तक्रारीचे षडयंत्र आखणाऱ्या तथाकथीत वार्ताहराची विशेष चौकशी करुन अटक करण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार संघ मारेगाव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मारेगांव येथील दोन प्रतिष्ठित पत्रकार तथा प.स. मारेगांव अंतर्गत एक जि.प. शिक्षक या तिघांवर तालुक्यातील खडकी (बु.) शाळेतील खिचडी मदतनीस फिर्यादी, मारेगांव येथील एक वार्ताहर व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईस अडकलेले नगरसेवक सोबत संगणमत करुन तथाकथीत व खोटा बनाव रचून दि.१०/०२/२०२४ च्या बनावट घटनेची तक्रार २९/२/ २०२४ ला दिल्यानंतर पो.स्टे. मारेगाव मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक वर्तुळात या निषेधार्य बातमी वरून संतापाची लाट पसरली असून सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
तक्रारकर्ती महिला ही खडकी (बु.) येथील प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम करीत होती. तीच्या गैरवर्तवणुकीने तीला शाळा व्यवस्थापन समितीने ठराव घेवून काढून टाकले. यामुळे सदर महिलेने तथाकथीत वार्ताहर व नगरसेवक यांच्या सहाय्याने दोन्ही पत्रकार व शिक्षकावर विनयभंगाची खोटी तक्रार केली. यामध्ये वादग्रस्त असणारे नुकतेच मारेगांवचे ठाणेदार जनार्दन खंडेराव घटनेच्या तथ्याची कोणतीही शहानिशा न करता केवळ तथाकथीत वार्ताहराशी साटेलोटे करुन 10 फेब्रुवारी ला घटना घडली असा खोटा बनाव तयार करून तब्बल अठरा दिवसानंतर 28 फेब्रुवारीला तक्रार आल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले. तक्रार कर्ती महिला उपोषणाला बसून होती, रात्री एक वाजता उपोषण सुटतं त्याच रात्री दोन वाजता गुन्हा दाखल होतो. या मध्ये त्या रात्री पोलीस ठाण्यातील cctv फुटेज तपासून काही कर्मचाऱ्यांचे मोबाईल कॉल रेकॉर्डिंग तपासले असता सत्य बाहेर येण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे.
यातील फिर्यादी ला तिच्या गैरवर्तनामुळे समितीने ठराव घेवून कामातून काढण्यात आले असल्याने पंचायत समिती मारेगाव येथे 10 तारखेला प्रचंड तांडव झाले होते. तीला खतपाणी घालणारा तथाकथीत वार्ताहर हा विविध पो.स्टे. अंतर्गत अनेकदा तुरुंगाची वारी करुन आलेला आहे. सहकारी नगरसेवक हा लाच प्रकरणात गुन्हे दाखल होवून जेलवारी करुन आलेला आहे. तर खोटे गुन्हे दाखल करणारा ठाणेदार नगरसेवक राहुल राठोड मारहाण प्रकरणात मोठा वादग्रस्त ठरलेला आहे.
एकंदरीत फिर्यादी महिला तथाकथीत वार्ताहर, खंडणीबाज नगरसेवक व वादग्रस्त ठाणेदार यांच्या संगणमतातून व षड्यंत्रातून कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभुमी नसलेले एक शिक्षक व दोन पत्रकारावर विनयभंग सारखा अतिशय लांच्छनास्पद गुन्हा दाखल झाला असल्याने सर्वच संतापाची लाट पसरली आहे. ते माध्यम क्षेत्रात असल्याने त्यांच्या लिखाणाव्दारे काही लोकांची मने दुखावल्या गेले असतील. त्यामुळे या घटनेशी कुठलाही संबंध नसतांनाही त्यांचा संबंध जोडून समाजातील सामाजिक स्थान मलिन करुन संगणमत करुन रचलेला डाव आहे. या प्रकरणाची निष्पक्ष सखोल चौकशी करण्यात यावी व तीघांवर दाखल गुन्हे रद्द करुन फिर्यादी तथा तथाकथीत वार्ताहर नगरसेवक यांचेवर खोटा गुन्हा दाखल केल्या प्रकरणी कायदेशिर कारवाई करण्यात यावी व वादग्रस्त ठाणेदार यांची विशेष चौकशी करुन यांना निलंबित करण्यात यावे.
या संदर्भात उचास्तरिय चौकशी करून कडक कारवाई न झाल्यास ७ दिवसानंतर पत्रकार संघटना आमरण उपोषणास बसून कायदेशिर न्याय मागणीकरीता आंदोलन करण्याच्या इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.