वणीत स्त्री पंख सांस्कृतिक महोत्सव. उद्घाटक उद्योजिका वंदना भारद्वाज तर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण सिने अभिनेत्री काजल राऊत.
प्रयास महिला विचार मंच व क्रांतीज्योती शहर संघाचे आयोजन.
राजू तूरणकर – संपादक लोकवाणी जागर
वणी स्थानिक प्रयास महिला विचार मंच व क्रांतीज्योती शहर स्थळ संघ वणी द्वारा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
स्त्री पंख सांस्कृतिक महोत्सव 2024 याअंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त दिनांक 10 मार्स 24 सकाळी काळी दहा वाजता एस बी हॉल येथे उद्योजक महिला गटांचे प्रदर्शन होईल. त्यानंतर 11 वाजता कार्यक्रम चे उदघाटन सुपर मॉडेल हिंदी सिनेमा निर्माती उद्योजिका वंदना भारद्वाज मुंबई ह्या करतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठी अभिनेत्री, तथा राष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू काजल राऊत राहतील. सकाळी 11.30 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम सुरु होईल होईल. यात सोलो डान्स आणि ग्रुप डान्स, करा ओके सॉंग, फॅशन शो स्पर्धा सादर केले जातील. तसेच विविध विषयावर मार्गदर्शन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता सर्व स्पर्धे मधील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येईल. या कार्यक्रमास जास्तीत जास्त महिलांनी व शहरातील सर्व बचत गट महिलांनी सहभागी होण्याची आवाहन वजा विनंती ॲड पौर्णिमा शिरभाते , वनिता खंडाळकर मृणाली मस्के, सोनाली तिवारी आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे.