शिंदे गट शिवसेना उप तालुका प्रमुख शिरीष अवताडे यांचा (उबाठा) गटात प्रवेश.

0
988

शिंदे गट शिवसेना उप तालुका प्रमुख शिरीष अवताडे नांदेपेरा यांचा शिवसेना (उबाठा) गटात प्रवेश.

संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांची घरवापसी सुरू.

राजू तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.

शिवसेना उबाटा गट वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील शिंदे गटात गेलेल्या अनेक शिवसैनिकांनी काल संजय देरकर यांचे निवासस्थानी वणी विधानसभा संपर्क प्रमुख संतोष माहुरे, माजी उपजिल्हा प्रमुख दिपक कोकस, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांचे प्रमुख उपस्थितीत शिवबंधन बांधून प्रवेश केला.

संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील शिवसैनिकांची घरवापसी  सुरू झाल्याने ज्येष्ठ शिवसैनिकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाठी – लाडगुडा सर्कल मधील शाखाप्रमुख भुरकी येथील उपसरपंच विनोद दानव, शाखाप्रमुख  सुमित कुंमरे, रामा गाडगे, मनोहर कनाके, विलास वाढई, विनायक पिंपलकर, रांगणा येथील तुळीशराम सातपुते, कैलास सालुरकर, कोंडू काळे, गोविंदा कुंमरे, नांदेपेरा येथील अजय भोसले शाखाप्रमुख, विजय राजूरकर उपशाखाप्रमुख, नांदेपेरा 2 मधील संतोष दूमोरे , पवन पेचे व असंख्य शिवसैनिकांनी प्रवेश केला यावेळी नेताजी पारखी, कैलास मेश्राम हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here