गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्थेचे दैनिक बचत अभिकर्ता राजेश पुण्यानी यांचे अपघाती निधन

0
1468

गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्थेचे दैनिक बचत एजंट राजेश पुण्यानी यांचे अपघाती निधन.

थांबून फोन वर बोलत असलेल्या राजेशला मागून अज्ञात वाहनाने दिली धडक, गंभीर जखमी, उपचारादरम्यान मृत्यू.

राजू तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.

मारेगाव वरून दैनिक बचत वसुली आटपवून वणीला परत येत असताना मंगरूळ जवळ रात्री 8:30 वाजे दरम्यान अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने राजेश पुण्यानी हे गंभीर जखमी झाले व   त्यांना नागपूर येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते 53 वर्षाचे होते.

वणी येथील गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्थेची दैनंदिन निधी जमा करणाऱ्या राजेश पून्यानी अभिकर्त्याचे गुरुवारी या रात्रीचे सुमारास अपघाती निधन झाल्याची घटना घडली आहे.

वणी-यवतमाळ मार्गावरील मांगरुळ गावाजवळील घटना.

वणी शहरातील राजेश नरसिंग पुण्यानी हे शहरात असलेल्या गुरुदेव नागरी सहकारी, पतसंस्थाची दैनंदिन निधी गोळा करण्यासाठी अभिकर्ता म्हणून काम करीत होते. गुरुवारी रात्रीला नेहमीप्रमाणे राजूर, वणी येथील खातेदारांची जमा रक्कम गोळा करून मारेगाव वरून वणी कडे जात असताना मांगरुळ नजीक राजेशला फोन आल्याने तो बोलण्यासाठी थांबला. दरम्यान मागून येणाऱ्या सुसाट कार ने राजेश ला जबर धडक दिली. यात राजेश खाली पडला व गंभीर जखमी झाला. लोकांनी त्याला प्रथम मारेगाव येथे व नंतर वणीच्या रुग्णालया उपचारासाठी दाखल केले आहे होते परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविले.त्यात राजेशचा रात्रीच मृत्यू झाला. हा अपघात रात्री 8: 30 वाजताचे सुमारास घडल्याची माहिती आहे. सध्यातरी मागून धडक देणारे वाहन अज्ञात आहे.

राजेश हे अनेक वर्षापासून दैनिक बचत वसुली अभिकर्ता म्हणून पुसद अर्बन बँकत्यानंतर रंगनाथ स्वामी नागरी पतसंस्था आता गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्था वणी येथे दैनिक बचत अभिकर्ता होते. त्याचे वणी, राजूर, चिखलगाव, मारेगाव परिसरात भरपूर ग्राहक आहे व त्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात दैनिक वसुली होती,त्याचा मनमिळाऊ स्वभाव व तो नेहमी हसतमुख राहत असल्याने सर्वांच्या परिचयाचा झाला होता. परिणामी राजेश च्या अपघाती निधनाने मित्र परिवारासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. राजेशच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

नागपूर येथील प्रसिद्ध शुवरटेक हॉस्पीटल मध्ये त्यांचे उपचारादरम्यान  निधन झाले. त्यांचा मृतदेह मेडिकल कॉलेज नागपूर येथे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांना वणी येथे त्यांचे राहते घरी आणून वणी येथील मोक्षधाम मध्ये आज अंतिम संस्कार करण्यात येईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here