धनोजे कुणबी समाज संस्था, वणी र. नं. 8656 (य.) 302/2004 प्रतिभा धानोरकर यांना पाठिंबा….
मतदान करण्याचे राजेश पहापळे यांचे आवाहन.
राजू तुरणकर – संपादक.
धनोजे कुणबी समाज हा सदैव बहुजन समाजाच्या उन्नती, प्रगती व सर्वांगीण विकासासाठी नेहमी पाठीशी उभा राहीलेला आहे व बहुजन समाजाचे हित लक्षात घेता धनोजे कुणबी समाज संस्था, वणी जि. यवतमाळ तर्फे चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राकरीता उभ्या असलेल्या उमेदवार श्रीमती प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांना विजयी करण्यासाठी धनोजे कुणबी समाज संस्था, वणी च्या वतीने जाहीर पाठिंबा घोषीत करण्यात येत आहे.
तरी सर्व समाज बांधवांनी प्रतिभा धानोरकर यांना मतदान करून त्यांना विजयी करण्याचे आवाहन धनोजे कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राजेश पहापळे यांनी केले आहे.