जनमताचा कौल कुणाला, मतदान कुणाला, हवा कुणाची, कोण पडले प्रचारात कमी….
निष्ठावंत कार्यकर्ता नेमका कुणाच्या मागे….
राजू तुरणकर – संपादक.
महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती बघता सर्वच राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण दिसत आहेत. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ता कुणाच्या पाठीशी ठामपणे उभा राहील व मतदान करेल यात मात्र शंका निर्माण झाली आहे. मात्र चंद्रपूर लोकसभेच्या रिंगणात काट्याची टक्कर निर्माण झाल्याचे स्पष्ट चित्र पाहावयास मिळत आहे.
महिला मतदारांचा कौल निर्णायक.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात महिला सक्षमीकरण व सबलीकरणाच्या अनेक योजना महिलांपर्यंत पोहोचल्या त्यामुळे महिलांमध्ये पंतप्रधान मोदींच्या रूपाने सुरक्षितता या मुद्द्यावर महिला आश्वस्त असून त्या नेमक्या कुणाला व कोणत्या मुद्द्यावर मतदान करतात यावर उमेदवाराचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
2019 लां काय झाले होते.
2019 च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत, INC उमेदवार सुरेश नारायण धानोरकर 559,507 मते मिळवून विजयी झाले . दरम्यान, दुसरीकडे भाजपचे हंसराज गंगाराम अहिर यांना 5,14,744 मते मिळाली, मात्र ते विजयी झाले नाहीत. मात्र यावेळी भाजपाने विकास पुरुष अशी ख्याती असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली. काँग्रेस तर्फे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांची पत्नी प्रतिभा धानोरकर यांना तिकीट दिल्याने व कुणबी एकमेव उमेदवार असल्याने मतदार एकीकडे गेल्याने दोघांमध्ये काट्याची टक्कर निर्माण झाली आहे.
पंतप्रधान मोदींची चंद्रपूर सभा…
सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जंगी सभा पार पडली. या सभेला दीड लाखाचे वर मतदारांनी उपस्थिती दर्शविली होती. दुसरीकडे मात्र प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक कोणताही मोठा नेता आला नाही, त्यामुळे प्रचारदरम्यान ते लोकांना मोठ्या प्रमाणात एकत्रित आणू शकले नाही. त्यामुळे प्रचार यंत्रणा भाजपाच्या बाजूने भक्कम दिसून आली. अनेक फिल्म स्टार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेकांच्या प्रचारकांच्या सभा झाल्या, परंतु त्या पटीत मात्र काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांची रद्द झालेली सभा त्याऐवजी कन्हेया कुमार ची सभा फारसा प्रभाव पाडू शकली नाही व छोटेखानी सभा घेऊन प्रचारात माघारलेली काँग्रेस दिसून येते आहे. तरी जन माणसात प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारीवरून प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे हे ही तेव्हढेच खर आहे…
एकंदरीत निवडणूक प्रचारात विकास, महागाई, देश्याची सुरक्षा हे मुद्दे महत्त्वाचे न ठरता स्थानिक पातळीवरील राजकारणाचा जास्त प्रभाव दिसून आल्याने होणाऱ्या मतदानाचा कोणत्या पक्षाला फटका बसणार हे स्पष्ट नसल्याने निवडणूक निकाल कुणाचा बाजूने जाईल हे सांगता येणं शक्य नाही, एकंदरीत काट्याची टक्कर निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.