चालत्या कार ला आग, कार जळून खाक.

0
926

चालत्या कार ला आग, संपूर्ण कार जळून खाक.

सुदैवाने जीवित हानी टळली…

आनंद नक्षणे – मारेगाव.

मारेगाव तालुक्यातील खंडणी येथे रस्त्यावर चालत्या गाडीला आग लागल्याची भीषण घटना घडली आहे. गाडीला लागलेली आग एवढी वेगाने पसरली की काही वेळातच तिने संपूर्ण गाडीला वेढले आणि कार जळून खाक झाली.

बोटोनी वरून खंडणी कडे जात असताना मारुती कार ने अचानक पेट घेतल्याने गाडी मालक पवन नक्षणे यांनी गाडी लगेच थांबवून त्यांची पत्नी व लहान बाळ गाडीबाहेर पडले. सुदैवाने समोरील अनर्थ टळला. अवघ्या क्षणात कार ला आगीने कवेत घेत कार क्रमांक एम. एच.34 एफ 3898 जळून खाक झाली.आणि गाडी पूर्णपणे जळून खाक झाली हे विशेष (वायरिंग शॉर्ट झाल्याचा कयास आहे )

मारेगाव तालुक्यातील खंडणी येथील पवन यदुनंदन नक्षणे सह त्यांच्या पत्नी आणि दीड वर्षाचा मुलगा हे तिघे बोटोणी येथून खंडणी कडे निघाले. काही वेळातच सराठी रोड लगत जवळ कार पेट घेतल्याचे लक्षात येताच पवन नक्षणे यांनी क्षणाचाही विलंब न लावता कार थांबवली व मागील गेट तात्काळ उघडुन पत्नी आणि मुलगा यांना बाहेर काढले. दैव बलवत्तर असल्यामुळे सुदैवाने कोणत्याही जीवितास ईजा पोहचली नाही, मात्र कार जळल्याने पवन नक्षणे यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here