वणीत नाट्य व नृत्या द्वारे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा.

0
235

वणीत नाट्य व नृत्या द्वारे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा….

संतांची ही पवित्र भुमी , स्वराज्याचा साज हिचा …!सह्याद्रीचा दुर्ग अभेद्य , अटकेपार इतिहास जिचा …!! धन्य जाहलो जन्म घेउनी , जय जय महाराष्ट्र माझा… बाल कलाकारांनी गाजविला महाराष्ट्र दिन

आनंद नक्षणे- मारेगाव.

महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे 1960 ला झाली. महाराष्ट्र राज्याच्या पवित्र भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे झाले. आम्ही मराठी माणसं मराठी अस्मितेला जपण्यासाठी महाराष्ट्र दिन हा सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून नाट्य व नृत्या द्वारे उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करीत असतो.

सागर झेप बहुद्देशीय संस्था वणी तर्फे जैताई मंदिरात मराठी वेशभूषेत 33 बाल कलाकारांच्या समूहाने मराठी अस्मितेला शोभेल असे बहुरंगी कार्यक्रम घेऊन हा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाला माजी नगर सेवक, सामाजिक कार्यात सदा अग्रेसर राजू तुरणकर, पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रसिद्ध वारली चित्रकार शेखर वांढरे, नाट्य कलावंत अशोक सोनटक्के उपस्थित होते.

सागर मुने दिग्दर्शित “पुस्तकाच्या पानातून” हे बाल नाट्य सादर केले तसेच प्रियंका कोटणाके यांनी मराठी अस्मितेला जपणारे, राज्यातील निवडक गीतांवर व महाराष्ट्र गीतावर उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शित करून सर्व उपस्थित रसिकांचे मन जिंकले. या मध्ये 6 ते 15 वयोगटातील एकूण 33 मुला मुलींनी नृत्य सादर केले होते. कार्यक्रमाला प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती, गरिबांसाठी सतत मदतीला धावणारे, भाजपचे प्रदेश सदस्य व धडाडीचे कार्यकर्ते विजय चोरडिया, मुन्ना महाराज यांच्या हस्ते कलावंतांना सन्मानित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वणी विधान सभेचे लोकप्रिय आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार व जैताई देवस्थान चे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here