ओल्या बाळंतिणीची आत्महत्या, गावच्या मध्यवस्तीतील विहिरीत आढळला मृतदेह.

0
1384

ओल्या बाळंतनीची आत्महत्या, मध्यवस्तीतील विहिरीत आढळला मृतदेह…

दिवसभर जंगलात शोध, तर गावातील त्याच विहिरीवर दिवसभर महिलांनी धुतली धूनी..

आनंद नक्षणे – मारेगाव

एक वर्षापूर्वी लग्न आणि पंधरा दिवसापूर्वी बाळंतपण झालेली विवाहित युवती अचानक परवा मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास घरून निघून गेल्याची घटना त्या 14 दिवसाच्या बाळाच्या रडण्याच्या आक्रोशाने घरच्यांच्या लक्षात आली, आणि एकच धांदल उडून शोधा शोध सुरू झाली. काल पासून घरचे  व सर्व गावातील लोक संपूर्ण परिसर व लागून असलेला अख्खा जंगल भाग निरखून पाहून सुद्धा थांग पत्ता लागत नव्हता , मात्र काल मंगळवारी ठिक 6 वाजून 30 मिनीटांनी मृतदेह गावाच्या मध्यवस्तीत असलेल्या विहिरीतच गवसला.

बोटोनी येथील भाजपचे जिल्हा सरचिटणीस शंकरजी लालसरे यांचे सुपुत्र विपुल लालसरे याचा विवाह 16 एप्रिल 2023 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील बेलसणी ता. भद्रावती येथील वामन मिलमिले यांची मुलगी शुभांगी हिच्याशी झाला होता. गोंडस बाळ जन्माला आले, निरागस पाहुण्याच्या आगमनाचा कुटुंबात आनंद उत्सवाची स्वप्ने मनी रंगवत असतांना, मात्र शुभांगी च्या मनात काय होते याचा कुणालाही थांगपत्ता नव्हता, आणि ती मंगळवारला मध्यरात्री सुमारे 2 वाजताचे दरम्यान बाळाला सोडून निघून गेली, सर्व गावकरी आपल्या लेकीला शोधण्यासाठी संपूर्ण परिसर पिंजून काढू लागले. आजूबाजूची संपूर्ण शेत, गावाला लागून असलेले जंगल, गावोगावी शोध मोहीम सुरू होती,  कुठेही थांग पत्ता लागत नव्हता, वेगवेगळे तर्क वितर्क लावल्या जावू लागले ,अन शेवटी तिचा मृतदेह मात्र गच्च भरलेल्या वस्तीतील मधोमध असलेल्या सरकारी विहिरीत सायंकाळी 6 वाजता आढळला, विशेष म्हणजे याच विहिरीत दिवसभर गावातील महिलांनी आपली कपडे धुतली, मृत्यू पूर्वी तिने आपली चप्पल पाणी काढण्याच्या खराडीला लावून ठेवली होती, ती चप्पल ओळखल्याने विहिरीत गर टाकून पहल्याने तिचा मृतदेह हाती लागला , आणि संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले.

आज सकाळी दहा वाजता शुभांगी हिच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here