रेती तस्कर कोण, तीन रेती हायवा जप्त.

0
709

सरकारी रेती घाटावरून सर्हास रात्रीला चोरी, रेती काढणारे ठेकेदाराच मास्टर माईंड. 

रात्रीला रेती तस्करी करताना 3 हायवा जप्त, अहेरी बोरगाव रेती घाटावर मध्यरात्री महसुल पथकाची धाड….

राजू तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.

सरकारने गरजवंत जनतेला सहाशे रुपये ब्रास या अल्प दरात रेती उपलब्ध व्हावी या उद्देशाने वाळू उपसा करून सरकारी ठेकेवर स्टॉक करण्याचे कंत्राट खाजगी ठेकेदारांना दिले, परंतु रेती तस्करांनी मात्र याला सोन्याची अंडी देणारा ठेका समजून रात्रीला हेच रेती काढणारे मस्तवाल ठेकेदार सर्रास  रेती तस्करी करताना महसूल प्रशासनाच्या कार्यवाहीत सातत्याने उघड झाले आहे. मात्र कठोर कारवाई होत नसल्याने रेती तस्करांची तस्करी दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे

वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व रेती घाट बंद असताना काही घाटावरून मध्यरात्री रेती तस्करीचा खेळ सुरु असल्याचे शुक्रवारी उघड झाले. घाटावरून अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहितीवरुन महसूल पथकाने गुरुवारी मध्यरात्री अहेरी (बोरगाव) घाटावर धाड टाकून 3 हायवा ट्रक जप्त केले. महसूल पथकाने धाड टाकताच दोन ट्रक चालकांनी ट्रकमध्ये भरलेली रेती तिथेच खाली केले. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी रेती भरलेला एक व दोन रिकामे ट्रक जप्त केले.

तालुक्यात रेती तस्करी रोखण्यासाठी महसूल विभागाने पथक स्थापन केलेले आहे. गुरुवारी नाईट पेट्रोलिंग करताना महसूल पथकाला अहेरी (बोरगाव) रेती घाटावर अवैधरीत्या रेती उपसा होत असल्याची माहिती मिळाली. या अहेरी बोरगाव रेती घाटाची मुदत संपली असल्याने रेती उपसा बाबत मंडल अधिकारी देशपांडे यांनी तात्काळ नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार यांना सूचना दिली. सूचनेवरून नायब तहसीलदार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन रात्री 1.30 वाजता अहेरी (बोरगाव) रेती घाटावर छापा टाकला.
महसूल अधिकाऱ्यांनी रेती घाटावर रेती भरलेला हायवा ट्रक क्रमांक MH40-BG 0198 मध्ये तब्बल 9 ब्रास रेती भरलेली आढळली. तर MH 40-CT 3742 आणि MH34 – BG 9064 क्रमांकाच्या ट्रक चालकांनी छापा पडताच ट्रक मध्ये भरलेली रेती जागेवरच खाली केली.

महसूल अधिकाऱ्यांनी पंचनामा करून तिन्ही ट्रक तहसील कार्यालय परिसरात लावले. सदर कार्यवाही उप विभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार निखिल धुळधर यांचे मार्गदर्शनात नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार, मंडळ अधिकारी देशपांडे, तलाठी पाचभाई, मोहितकर, इंगोले, गोहने यांनी केली.

अहेरी बोरगाव मुदत बाह्य रेती घाटावर, महसूल अधिकाऱ्यांनी केली अर्धवट कारवाई, रेती तस्करांना आरोपी न करता पंचनामा करून सोडून देणे, मध्यरात्री रेती घाटावर मोठमोठी वाहने काय करतात, सकाळ ते सूर्यास्त पर्यंत रेती काढण्याचा परवाना असताना ठेकेदाराची मध्यरात्री नदीपात्रात कोणते काम, याच प्रश्नांमध्ये सर्व उत्तरे दडले असल्याने महसूल प्रशासन मात्र कोणतीही सीसीटीव्ही फुटेज अथवा जीपीएस न तपासता नंतर  कागदपत्राच्या हेराफेरीत सुटणारी वाहन, याकडे जनतेचे सातत्याने लक्ष असून तेच तस्कर आणि तेच अधिकारी, यावेळी मात्र कारवाई कडे सखोल लक्ष ठेवून आहे. वाळूचे अवैध उत्खनन आणि नंतर चोरट्या वाहतुकीतून निर्माण होणारे कोट्यवधी रुपये जातात कुठे हे शोधण्यासाठी, सर्व आर्थिक व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट सुरू करण्याच्या मागणी सह जनहित याचिका दाखल करणार असल्याची चर्चा जोर धरून आहे.

संघाहित चित्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here