आर्या सचिन मते वणी पब्लिक स्कूल मधून प्रथम तर तालुक्यातून तिसरी….
आर्या ला व्हायचे शात्रज्ञ….
राजू तुरणकर – संपादक.
छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूलने दहावीच्या परीक्षेत 100% निकाल लागला असुन उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. या वर्षीही दहावी स्टेट बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. कु. आर्या सीमा सचिन मते हिने शाळेतून प्रथम तर तालुक्यातून तिसरी येण्याचा बहुमान पटकावला आहे.
दिनांक 27 मे रोजी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत कु. आर्या सचिन मत्ते 94.40 गुण मिळवत शाळेतून प्रथम क्रमांक व तालुक्यातून तिसरा क्रमांक पटकाविला. तसेच कु. हर्षदा राजू आवारी हिने 93.80 गुण प्राप्त करून शाळेतून 2 रा तसेच गुंजन सुनील बोबडे 92.40 गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. शाळेतील एकूण विद्यार्थी पैकी 36 विद्यार्थ्यां विशेष प्रविण्यात यशस्वी झालेत. संस्थेचे सचिव ओमप्रकाश चचडा, निलेश चचडा, विक्रांत चचडा व प्राचार्य राजुरकर मॅडम यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले , आर्या आपले यशाचे श्रेय आई, वडील व व गुरुजनांना देत आहे.
आर्याला व्हायचे शात्रज्ञ …
उच्च शिक्षण घेवून, शात्रज्ञ होवून काही तरी नवीन शोध लावण्याचे धेय्य असल्याचे आर्याने लोकवाणी सी बोलताना सांगितले.