मारेगावात एका दिवशी पंधरा चोऱ्या, नागरिकांत पोलीस प्रशासनावर प्रचंड रोष.

0
192

पोळ्यासाठी गावी गेलेल्या एका रात्री पंधरा घरी चोरी, मारेगाव माधवनगरी मधिल चोरीचा शोध घेण्याची मागणी घेवून नागरीकांची पोलीस स्टेशनवर धडक.

नागरिकांत पोलीस प्रशासनावर प्रचंड रोष, ठानेदारानी दिला धीर.

आनंद नक्षने—मारेगाव

पोळ्यासाठी गावी गेलेल्या लोकांच्या घरी बडग्याच्या रात्री माधव नगरी व इतर दोन ठिकाणी १५ पेक्षा जास्त घरात घरफोडी करून चोरट्यानी लाखो रुपयाचे सोने व नगदी रकमेची घरफोडी केली मात्र पंधरा दिवसाचां कालावधी उलटूनही अजून पर्यंत मारेगांव पोलीसांना चोरटे पकडण्यात यश वा या संदर्भात तपास कार्यात पोलीस प्रशासन गंभीर नसल्याने पोलीसाच्या कार्य शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करित ज्या कुटूंबाच्या घरात घरफोडी झाली तेथील पिडीत महिला पुरुषानी मारेगांव पोलीस स्टेशनवर धडक देत चोरी च्या तपास कुठ पर्यंत आला अशी विचारणा करून रात्रीची गस्ती वाढविण्याची निवेदनातून मागणी करण्यात आली.

 

मारेगाव शहराच्या इतिहासात पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्याने नागरिकांत पोलीस प्रशासना विरोधात प्रंचड प्रमाणात रोष व्यक्त करण्यात आला.

मारेगांव येथील माधव नगरी, ओम नगरी व निर्मिती येथील १५ पेक्षा जास्त घरातील कुटूंबे पोळ्या निमित्य उत्सव साजरा करण्यासाठी स्वगावी गेले असता, अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घरफोडी करित लाखो रुपयाचे सोने व नगदी रकम लंपास केली या घटनेने प्रचंड खळबळ उडाली, घटनेची माहिती पोलीस स्टेशनला मिळताच मारेगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक जनार्दन खंडेराव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला, चोरच्याचा शोध घेण्यासाठी डॉग स्कॉट व फिंगर प्रिन्ट एक्सफर्टला पाचारण करण्यात आले मात्र १५ ते २० दिवस उलटले तरी माधव नगरी मधिल धाडसी घरफोडीचा कुठलाही शोध न लागल्याने मारेगाव पोलीसाच्या कामगिरी वर प्रश्न चिन्ह उभे करित शनिवारला माधव नगरी मधिल महिला पुरुषानी पोलीस स्टेशनला धडक देत झालेल्या घरफोडी करणाऱ्या चोराचा शोध घ्यावा व रात्रीची गस्ती नियमित व्हावी या आशयाचे निवेदन सादर केले , त्यावेळी मारेगांव पोलीस स्टेशनचे ठानेदार जनार्दन खंडेराव यांनी आलेल्या नागरिकांना धिर देत घटनेचा तपासासाठी पोलीस प्रशासन अलर्ट असल्याच सांगत एका ठिकाणी घेतलेल्या फिंगर प्रिट एक्सफर्ट कडे तपासनी साठी पाठविले आहे, ते प्रिंट कुठल्या आधार कार्ड शी मॅच होते यावरून पथक कार्यरत असल्याचा विश्वास दिला. निवेदनवेळी हेमराज कळंबे , विजय झाडे, सुरेश आत्राम , मंगेश गवळी , सुंदरलाल आत्राम , संतोष ठाकरे , सुनंदा कोळेकर , बाळू काकडे , सुनील भोयर , राजू डवरे , प्रविण बदकी , चंद्रशेखर बोकडे , दीपक उरकुडे , गणेश कनाके , रमेश बोंडे यांचेसह बहुसंख्य नगरीतील पुरुष व महिलांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here