मारेगावात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ; समाजसेवक , लोकसेवक व मान्यवरांचा गौरव.
राजू तुरणकर यांचा पर्यावरण प्रेमी उद्योजक म्हणून गौरव.
आनंद नक्षणे _ मारेगाव : सावित्रीबाई फुले गुण गौरव समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा व विशेष मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुमारे शंभराहून अधिक गुणवंतांचा सत्कार करण्यात येऊन समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा तसेच प्रशासनातील कर्मचारी यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.
सन २०२३-२४ या सत्रात १० वीच्या परिक्षेत ८० टक्के व १२ वी च्या परीक्षेत ६५ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शेतकरी सुविधा केंद्र मारेगाव येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, तर उद्घाटन वर्धमान फाउंडेशन वणीचे अध्यक्ष तथा बुलढाणा अर्बन को.ऑ.बँक संचालक विजय चोरडीया यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना तहसीलदार उत्तम निलावाड, गिरीश बोंन्डे नायब तहसीलदार मारेगाव, गटविकास अधिकारी भिमराव वानखेडे, कृषी अधिकारी संदिप वाघमारे, सेंट्रल बँक व्यवस्थापक आरीफ शेख यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विशेष अतिथी म्हणुन सेवानिवृत्त दुग्ध विकास विभागचे कार्यालय अधिक्षक श्रीराम कुमरे तर, स्वागताध्यक्ष म्हणून अ.भा.सं प. सचिव सुरेश लांडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन सरपंच तुळशिराम कुमरे, नगरपंचायत बांधकाम सभापती अंजुम शेख, या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विध्यार्थाना गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आयोजीत या सन्मान सोहळ्यात वर्ष भरात उत्तम सेवा करणाऱ्या लोकसेवक व पदाधिकारी यांना सुध्दा सन्मानित करण्यात आले. यामध्ये समाजसेवक पर्यावरण प्रेमी उद्योजक म्हणून राजू तुरणकर संचालक चापली पवन सुत नर्सरी मांगरुळ ( गौराळा ) कोसारा येथील वृध्दाश्रमाचे अध्यक्ष जितेंद्र जाधव, पत्रकार कुमार अमोल, तलाठी जयवंत कनाके, पोलीस पाटिल प्रेमानंद गाणार, ग्रामसेवक विलास शिवरकर, अंगणवाडी सेविका दमयंती फुलझेले, संगीत कला विशारद रविकिरण घुमे, डॉ. कवि विनोद कुमार आदे ह्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

समाज सेवकांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, पत्रकार, अंगणवाडी सेविका,उद्योजक तथा पर्यावरणप्रेमी, समाज सेवक, संगीत कला, हयांना गौरव पुरस्कार वितरण करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, पालक, तथा उपस्थीतासाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन प्रतिभाताई तातेड समिती अध्यक्ष, सहआयोजन माणिक कांबळे पत्रकार, कुमार अमोल यांनी केले.
