आज क्रांती दिनी काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा.

0
88

आज क्रांती दिनापासून काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा.

आशिष खुलसंगे यांची शेतकरी न्याय यात्रा 22 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्रात फिरणार.

राजू तुरणकर 

वणी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि इतर अनेक मागण्यांच्या संदर्भात 9 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या दरम्यान शेतकरी न्याय यात्रा आयोजित करण्यात आली असून ही यात्रा वणी विधानसभा मतदार संघातुन काढण्यात येणार आहे, ही यात्रा वणी, मारेगाव, झरी जामणी, तालुक्यातून फिरणार असल्याची माहिती झरी जामणी तालुका काँग्रेस कमिटीचे तसेच वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी वनी चे अध्यक्ष आशिष खुलसंगे आणि जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली होती,यावेळी माजी आमदार वामनराव कासवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते..

गेल्या दहा वर्षापासून सरकारच्या  धोरणामुळे जनता त्रस्त झाली असून कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ पहावयास मिळत आहे यामुळे शेतकरी हवालदिल झाला याशिवाय महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे वणी विधानसभा क्षेत्र खनिज संपत्ती वनसंपत्ती इत्यादींनी संपन्न असताना देखील नागरिकांना विकासापासून वंचित राहावे लागत आहे.त्यांना न्याय देण्यासाठीच न्याय यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेमध्ये शेतकऱ्यांचे सर्व मुद्दे उपस्थित करून त्यावर जागृती केल्या जाणार असून 22 ऑगस्ट पर्यंत ही न्याय यात्रा वणी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावात फिरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here