तहसील कार्यालय वणी येथील तालुका पुरवठा अधिकारी लाच लुचपत पथकाच्या जाळ्यात.
वणी तहसील कार्यालयाची अभ्रू चव्हाट्यावर, सर्वच विभागात चालते लाचखोरी, मस्तवाल अधिकाऱ्यांमुळे त्रस्त जनता..
राजु तुरणकर – संपादक…
वणी तहसिल कार्यालयातील लाचखोरी सर्वश्रुत आहे. सर्वच विभागात पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही. मस्तवाल अधिकाऱ्यांच्या धोरणामुळे व लवकर काम करून घेण्याच्या अडचणीमुळे नागरिकांना सर्रास इथे नाईलाजाने लाच द्यावी लागत असल्याचे दिसून येते. आज याचा उद्रेक झाल्याचे दिसून येत आहे.
वणी तहसिल कार्यालयातील पुरवठा निरीक्षकाला एसीबीच्या पथकाने गुरूवारी दुपारी ७० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. गेल्या महिनेभरापासून या लाचखोर अधिकाऱ्याच्या कारनाम्याची चर्चा वर्तुळात सुरू होती. संतोष च्या संपर्कात तालुक्यातील रेशनचा काळाबाजार करणारे अनेक जण या अधिकाऱ्याच्या संपर्कात होते. अखेर परवानाधारक बंडू देवाळकर चिखलगाव राशन परवाना धारक संघटनेचे तालुका सचिव यांनी एसीबीकडे तक्रार केली आणि लाचखोर अधिकारी गजाआड झाला.
संतोष उईक (४०) असे या लाचखोर निरीक्षकाचे नाव आहे. त्यांनी वणी येथील तक्रारदाराला ७० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी काहीं रुपयांची लाच पहिलेच स्वीकारली होती. उर्वरित काहीं हजारांची रक्कम त्यांनी अमरावती एसीबीच्या पथकाने लावलेल्या सापळ्या समोरच स्वीकारली. वणी तहसील कार्यालयातील रेशन कार्ड विभागात पैसे देताना संतोष उइके याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून लाचेस्वरूपात स्वीकारलेली ७० हजारांची रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी वृत लिहीपर्यंत वणी पोलिस ठाण्यात एसीबीने तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई अमरावती येथील पोलिस निरीक्षक योगेश दंदे व सहकारी यांनी केली.
वणी तहसिल कार्यालयात असलेल्या सर्वच विभागात लवकर काम करून देण्याचे नावाखाली कामे अडवून पैसे घेण्याचा धंदा सुरू असल्याने जनता त्रस्त झाली आहे. यामुळे झालेल्या कारवाई बद्दल सामान्य जनता आनंद व्यक्त करतांना दिसून येत असुन पुन्हा काही अधिकारी जाळ्यात अडकले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करीत असुन, तक्रारदार बंडू देवाळकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
<