त्या राजीनाम्यासी माझा काही सबंध नाही-: वनिता सारंग काळे मारेगाव महिला तालुका संघटीका.
मारेगाव महिला तालुका संघटीका शिवसेना ( ऊबाठा) गट यांचा पक्षासी एकनिष्ठ राहण्याचा निर्धार….
संजय देरकर यांना विजयी करण्याचे आवाहन.
लोकवाणी जागर.
वणी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ऊबाठा गटा) तर्फे संजय देरकर यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांनी देरकर यांचा विरोध करीत काही पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन राजीनामे दिल्याचे पत्र मारेगाव तालुका प्रमुख संजय आवारी यांचे लेटर पॅड वर 9 / 11/ 24 च्या पत्रकार परिषदेमध्ये वितरीत करण्यात आले. या पत्रामध्ये मारेगाव तालुक्याच्या महिला संघटीका वनिता सारंग काळे यांचे नाव आहे, परंतु त्यांनी या रजिनाम्याशी माझा काही सबंध नसल्याचे स्पष्ट करीत, त्यावर मी सही सुद्धा केली नसल्याने, मी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची एकनिष्ठ शिवसैनिक असून संजय देरकर यांच्या पाठीशी खंभिरपणे उभे असल्याचे सांगून जनतेला मशाल या चिन्हा समोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे..
एकंदरीत या निवडणुकीमध्ये संपूर्ण मतदार संघात निष्ठावंत शिवसैनिक एकवटल्याचे चित्र निर्माण झाले आहे.