डॉ सुनील श्यामराव ठाकरे वडजापुर यांच्या शिवसेनेत प्रवेश…
शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांचे हस्ते बांधले शिवबंधन…
लोकवाणी जागर
उद्या होणाऱ्या वणी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात प्रचंड चुरस निर्माण झाली असून संजय देरकर यांना स्वतः हून जनता पाठिंबा देताना दिसुन येत आहे. गावागावात उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून जनतेने निवडणुक हातात घेतल्याचे चित्रं दिसुन येत असून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी जनता आतुर झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
शक्तिप्रदर्शनातील पदयात्रा मध्यें स्वयं स्फूर्तीने मतदारसंघातील महिलांनी तुफान गर्दी केली होती, आणि या महिलांच्या तोंडावर संजय देरकर हे एकच नाव होते. त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. यामुळे विजयाची खात्री हमखास असच महिलांमध्ये चित्र पाहायला मिळत आहे.
अश्यातच वणी परिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते डॉ सुनील श्यामराव ठाकरे वडजापुर यांनी संजय देरकर यांचे निवासस्थानी येवून संजय देरकर यांना पाठिंबा देत शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांचे हस्ते शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश केला. यावेळी दिपक कोकास, राजु तुरणकर, सुधीर थेरे उपस्थित होते.