राधाकृष्ण मूर्तीची, दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर विधिवत प्राणप्रतिष्ठा.

0
89

राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उसाहात संपन्न.

दत्त जयंतीच्या मुहूर्तावर चोरडिया परिवाराने विधिवत पूजन, होम हवन करून केली राधाकृष्ण मूर्तीची स्थापना.

वणी प्रतिनिधी — वणी शहरालगत असलेल्या मंदर शेत शिवारातील चोरडिया फार्म हाऊस येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा भव्य सोहळा उत्साहात पार पडला.

या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी वरोरा येथील  पाच पंडितांच्या हस्ते पूजा अर्चना होम हवन करून विधिवत पूजा करण्यात आली.  ॲड कुणाल चोरडिया व अर्धांगिनी ख्याती चोरडिया यांचे शुभहस्ते पूजा करण्यात आली. यानंतर दुपारी बारा वाजता महाआरती करण्यात आली. चोरडिया परिवाराच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तांनी घेतला.

यावेळी माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार संजय देरकर, भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे माजी आमदार विश्वास नांदेकर रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड देविदास काळे, पणन महासंघाचे अध्यक्ष संजय खाडे, शिवसेनेचे संजय निखाडे, अजिंक्य शेंडे, काँग्रेसचे इजहार शेख, राजू कासावार, राजु तुरणकर, प्रवीण खानझोडे  यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. यावेळी विजय चोरडिया आणि  सीमा चोरडिया यांनी सर्व भक्तांचे स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here