महसूल विभागाचा, तहसील परिसरात जप्त गाड्यांचा भंगार, स्वातंत्र्याचे प्रतिक आसलेल्या अशोक स्तंभाचा श्वास गुदमरतो.
वाहतूक पोलिसांचा दंडात्मक कारवाई वर जोर तर वाहतूक नियंत्रण व सुरक्षे कडे दुर्लक्ष ..
राजु तुरणकर – संपादक.
वाहतूक पोलिस आणि महसुल विभाग या अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य अभावामुळे सामान्य जनतेला आर्थिक भुर्दंड भोगावा लागत आहे. तहसिल परिसरात महसूल विभागाने अवैध्य रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर करवाई करत, अनेक वाहने जप्त केलीआहे.अनेक दिवसापासून ही जप्त वाहने उभी असून या ठिकाणी परिसराला भंगार बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्याचे प्रतीक असलेले अशोक स्तंभ सुद्धा श्वास घेण्यासाठी गुदमरतोय अशी अवस्था महसूल विभागाने निर्माण केली आहे.
तहसिल कार्यालय, उपविभागीय कार्यालय, पंचायत समिती, पोलीस प्रशासन अधिकारी कार्यालय व न्यायदेवतेचे मंदीर ही सर्व प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणीं एकत्र नांदते, त्यामुळे संपुर्ण विधानसभा क्षेत्रातील जनता आपली शासकिय कामे करण्यासाठी या ठिकाणी येत असते, इथे पार्किंग ची व्यवस्था नसल्याने जिथे जागा मिळेल तिथे आपली दुचाकी लावून आपले शासकिय काम करण्यासाठी नागरिक निघून जातात. मात्र गाडी रस्त्यावर उभी याचा दाखला देत त्या आधीच कामाच ओझ घेवुन आलेल्या इसमाला वाहतूक विभागाचे कर्मचारी आपले हातातले बाहुले दाखवून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारतात आणि यामुळे जनता त्रस्त झाली आहे.
महसूल विभागाने परिसरातील जप्त गाड्या तात्काळ हटवून परिसर मोकळा करवा अशी मागणी लोकवाणी जागर च्या माध्यमातून जनता करीत आहे.
भारतीय प्रजात्ताकदिनाच्या औचित्याने या ठिकाणी पूर्वी सुंदर सजावट करण्यात येत असायची व संपुर्ण वणीतील शाळेचे विध्यार्थी या ठिकाणी अशोक स्तंभाला मानवंदना देण्यासाठी एकत्र यायचे, माञ अनेक दिवसापासून महसूल प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे अशोकस्तंभ सुद्धा श्वास घेण्यासाठी गुदमरतो अशी अवस्था निर्माण झाली आहे.
उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी , वाहतूक अधिकारि यांनी या बाबीवर त्वरित तोडगा काढून जप्तितील वाहने हटवून जागा मोकळी करवी जेणेकरून कामासाठी आलेल्या नागरीकांना वाहने उभी करण्यासाठी जागा मिळेल. येणारा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन केवळ औपचारिकता म्हणून नव्हे तर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची एक सजग टीम असल्याचा संदेश जनतेत जावून उत्साहात व आनंदत साजरा होईल व स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला अशोक स्तंभ सुद्धा मोकळा श्वास घेण्यासाठी सज्ज होईल.