महाराष्ट्र राज्य मास्टर ॲथलेटिक्स स्पर्धेत सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पांडू तात्या बरोबर पत्नी वंदना यांची दमदार कामगिरी…
प्रवीण रोगे, वणी :- 45 वि महाराष्ट्र राज्य माँस्टर अँथल्यँटीक स्पर्धा नागपूर येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पांडुतात्या कवरासे ,व पत्नी वंदना कवरासे, यांनी दमदार कामगीरी करून मैदान गाजवून घवघवीत यश संपादन केले.
वार्ता- दी 27ते29 डिसेंबर 2024 दरम्यान झालेल्या 45 व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय माँस्टर अँथल्यँटीक स्पर्धा स्थळ – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ क्रिडासंकूल नागपूर येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक पांडुतात्या कवरासे, यांनी 58वर्षे वयोगटात, 100 मिटर धावणे अडथळा शर्यत मधे गोल्ड मेडल , 100मिटर वेगवान स्पर्धेत सिल्हर मेडल, लांब उडी मधे गोल्ड मेडल,4×100 मिटर धावणे रिले स्पर्धेत सिल्हर मेडल असे एकूण 4 पदके प्राप्त केले. तसेच त्यांच्या पत्नी वंदना कवरासे, यांनी 50 वर्षे वयोगटात भाग घेऊन थाळी फेक मधे कास्य पदक, भालाफेक मधे कास्य पदक प्राप्त केले. सदर स्पर्धेत महाराष्ट्रातून 400 पुरुष व महिला खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. व सदर स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्याचे खेळाडू यांनी दमदार कामगिरी करून एकूण 40 पदकांची कमाई केली.
विजेत्या खेळाडूंना मान्यवर प्रेसिडेंट चंद्रकांत तराळ, जनरल सेक्रेटरी डोमणीक सेव्हीयो, सेक्रेटरी सुधाकर पाटील, नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल , यांच्या हस्ते खेळाडूंना मेडल व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण खेळाडुंचे अभिनंदन माँस्टर अँथल्यँटीक असोसिएशन चे अध्यक्ष गुलाब भोळे, सचिव देवेंद्र भंडारकर सर, देवेंद्र चांदेकर सर, समता साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष देवानंद तांडेकर सर, महिला अध्यक्ष शिला पेडणेकर, प्रा. शितल दरेकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ,आंतरराष्ट्रीय खेळाडू साहेबराव राठोड, संस्कार क्रिडामंडळाचे पदाधिकारी, संतोष बेलेकार सर , खेळाडू, अवि लोखंडे, शारीरिक शिक्षक ,जितेंद्र सातपुते सर, सचिन भेंडे सर, मिहीर सर, तसेच यवतमाळ मतदार संघाचे आमदार बाळासाहेब मांगूळकर, वणी विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार संजयभाऊ देरकर , तसेच पो.स्टे.यवतमाळ ग्रामीण चे अधिकारी अमोल ढोकणे साहेब, संपूर्ण पोलिस अंमलदार, सामाजिक कार्यकर्ते नामदेव मेटकर, गणपत ढोले, संपूर्ण सेवानिवृत्त पोलीस संघटनेचे अधिकारी ,कर्मचारी, वेगाव येथील नागरिक यांनी खेळाडुंच्या दमदार कामगीरीची प्रशंसा करून अभिनंदन केले .व राष्ट्रीय स्पर्धा बेंगलोर येथे सन 2025 मधे होणाऱ्या स्पर्धेत निवड झालेल्या स्पर्धकांना यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या .त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.