सगणापूर बौद्ध विहारात सावित्रीबाई फुले व भिमा कोरेगाव शौर्य दिन संयुक्तपणे साजरा.
आनंद नक्षणे – संपादक.
मारेगाव : तालुक्यातील सगणापूर येथील नागरिकांनी बौद्ध विहार येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती ता. ५ जानेवारी रोजी संयुक्तरित्या उत्साहात साजरी केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी दादारावजी वानखेडे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विलास नरांजे व संजय तेलंग होते.यांनी १ जाने. १९१८ मधे भीमा कोरेगाव येथे घडलेल्या लढाईचा इतिहास सांगून समाजाला महत्व पटवून देत मार्गदर्शित केले. या कार्यक्रमाला गौरव चिकाटे मुख्याध्यापक सगणापूर, रेखाताई जीवने माजी अध्यक्ष महिला कमेटी,उज्वलाताई वानखेडे माजी सचिव महिला कमेटी, मार्शल प्रकाश ताकसांडे, मार्शल विजय कांबळे, मार्शल सातपुते सर, मार्शल गौतम टोतडे सर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.तसेच कार्यक्रमाला समता सैनिक दल मारेगाव युनिट चे कार्यकर्ते व पदाधिकारी यांचीही उपास्थिती होती.
कार्यक्रमाची प्रस्थावना वैभव वेले यांनी केली तर संचालन संदीप जीवने यांनी केले.
कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख मार्गदर्शक, प्रमुख अतिथी, आयोजक व कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतलेले सर्व ग्रामवासी इत्यादिंचे आभार राहुल वानखेडे यांनी केले.