श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था वणी चा मुंबई येथे गौरव.

0
137

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था वणीचा सहकार क्षेत्रातील उ्लेखनीय कार्याचा मुंबई येथे गौरव.

अध्यक्ष ॲड देवीदास काळे सन्मानित.

राजू तूरणकर—वणी श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था वणी र.नं. ११४२ ता.वणी जि.यवतमाळ यांचा सहकार क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल नवभारत नवराष्ट्र समूह तर्फे एग्रोटेक आणि सहकार पुरस्कार २०२३ हा कार्यक्रम दिनांक १२/१०/२०२३ रोजी होटल ताज प्रेसीडेंट, कफ परेड, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात गौरव करण्यात आला.

ॲड देवीदास काळे यांनी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय व नेत्रदिपक कार्य केल्या बाबत राज्याचे सहकार मंत्री मा.दिलीप वळसे पाटील, खासदार मा.सूनीलजी तटकरे व माजी मंत्री मा. बाळासाहेब थोरात यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. यावेळी ॲड देवीदास काळे यांचे सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची प्रशंसा करण्यात आली.
वणी येथील श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेचे अध्यक्ष पदाची जबाबदारी मागील २२ वर्ष पासून ते समर्थपणे सांभाळत आहेत.
यवतमाळ जिल्हा नागरी व पगारदार पतसंस्थांचा संघाचे ते कार्याध्यक्ष आहेत.वणी येथील वसंत जीनींग व प्रेसींग चे १२ वर्ष अध्यक्ष पद त्यांनी भुषविले आहे.
ॲड देवीदासजी काळे यांचे समर्थ नेतृत्व लाभल्या मुळे
श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेने आज संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र, २२ शाखा व ७१८ कोटी च्या ठेवी, सतत ऑडिट वर्ग A अशी उत्तम प्रगती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here